Wednesday, February 11, 2026
Homeआंदोलनरेल्वे कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी १२ फेब्रुवारीला धरणे आंदोलन

रेल्वे कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी १२ फेब्रुवारीला धरणे आंदोलन

रेल्वे कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी १२ फेब्रुवारीला धरणे आंदोलन
भुसावळ       खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी            – ऑल इंडिया एस.सी./एस.टी. रेल्वे एम्प्लॉईज असोसिएशन, भुसावळ मंडळाच्या वतीने रेल्वे कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी गुरुवार, दिनांक १२ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजता शहरातील डीआरएम कार्यालयासमोर भव्य धरणे आंदोलन व विरोध प्रदर्शन करण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.

 


असोसिएशनच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत झोनल अध्यक्ष सुधीर जंजाळे, मंडळ अध्यक्ष वाल्मिक देहाडे आणि मंडळ सचिव आर. सी. रावत यांनी आंदोलनाची घोषणा केली. रेल्वे कर्मचाऱ्यांवर अन्याय करणारे कामगारविरोधी कायदे त्वरित रद्द करावेत, पाईंटमन कर्मचाऱ्यांची ड्युटी ८ तासांचीच निश्चित करावी, आठवा वेतन आयोग लवकरात लवकर लागू करावा तसेच रेल्वे दवाखान्यास भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे, अशा प्रमुख मागण्या असल्याचे त्यांनी सांगितले.
या मागण्यांकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष न दिल्यास आंदोलन तीव्र करण्यात येईल, तसेच गरज पडल्यास भूक हडतालही करण्यात येईल, असा इशाराही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिला.
या आंदोलनात मोठ्या संख्येने रेल्वे कर्मचाऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या