Wednesday, February 11, 2026
Homeआरोग्यकाटेरी झुडपे व नाल्यांची साफसफाई; शिवसेना नगरसेवकांचा पुढाकार

काटेरी झुडपे व नाल्यांची साफसफाई; शिवसेना नगरसेवकांचा पुढाकार

काटेरी झुडपे व नाल्यांची साफसफाई; शिवसेना नगरसेवकांचा पुढाकार

वरणगाव खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी                     वरणगाव ता भुसावळ
शहरातील सर्वात मोठ्या आणि विस्तारलेल्या प्रभाग क्रमांक दहा अंतर्गत येणाऱ्या गणपती नगर, जालंधर नगर, सिद्धेश्वर नगर व हनुमान नगर परिसरात शिवसेनेच्या नगरसेवकांच्या पुढाकाराने व्यापक स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.अनेक दिवसांपासून दुर्लक्षित असलेली काटेरी झुडपे काढून टाकण्यात आली असून गटारी व नाल्यांची सखोल साफसफाई करण्यात आल्याने परिसरात स्वच्छता व सुरक्षिततेचा प्रश्न मार्गी लागला आहे.

प्रभाग क्रमांक दहामध्ये मोठ्या प्रमाणावर लोकवस्ती असून गेल्या काही काळात काही भागांत काटेरी झुडपे वाढून परिसर अस्वच्छ झाला होता. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नाले व गटारी तुंबल्यामुळे दुर्गंधी, डासांचा प्रादुर्भाव व आजारांचा धोका निर्माण झाला होता. याबाबत स्थानिक नागरिकांनी शिवसेनेच्या नगरसेविका तृप्ता महाजन, विनोद झोपे व माला मेढे यांच्याकडे वारंवार तक्रारी केल्या होत्या.
नागरिकांच्या तक्रारींची गांभीर्याने दखल घेत नगरसेवकांनी तत्काळ नगरपरिषदेच्या सफाई कर्मचाऱ्यांना पाचारण केले. प्रत्यक्ष ठिकाणी उपस्थित राहून त्यांनी काटेरी झुडपे काढणे, नाले व गटारी साफ करणे, साचलेला कचरा उचलणे आदी कामे करून घेतली. या कामामुळे परिसर खुला, स्वच्छ व सुरक्षित झाला असून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
या स्वच्छता उपक्रमामुळे स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून शिवसेनेच्या नगरसेविका तृप्ता महाजन, विनोद झोपे व माला मेढे यांच्या तत्परतेचे आणि कार्यक्षमतेचे विशेष कौतुक केले जात आहे. अशा प्रकारचे उपक्रम सातत्याने राबवावेत, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या