Friday, February 20, 2026
Homeजळगावनिंभोरा बुद्रुक बस स्टाॅप ते रेल्वे स्टेशन पर्यंतचा रस्ता त्वरित करावा.

निंभोरा बुद्रुक बस स्टाॅप ते रेल्वे स्टेशन पर्यंतचा रस्ता त्वरित करावा.

निंभोरा बुद्रुक बस स्टाॅप ते रेल्वे स्टेशन पर्यंतचा रस्ता त्वरित करावा.

मनसेचा आंदोलनाचा इशारा

रावेर (खान्देश लाईव्ह प्रतिनिधी) तालुक्यातील निंभोरा बुद्रुक येथे बस स्टॉप ते निंभोरा रेल्वे स्टेशन पर्यंतच्या रोडचे बांधकाम अतिशय संथ गतीने तसेच निष्कृष्ट दर्जाचे केलेले आहे

त्यामुळे सदर रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्या शेतकऱ्यांना तसेच शाळकरी विद्यार्थ्यांना व नागरिकांना खूप मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे .संबंधित रस्त्याच्या या कामाविषयी लोकप्रतिनिधी यांना वारंवार सुचना देऊन सुद्धा लोकप्रतिनिधी याकडे दुर्लक्ष करीत आहे. हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे होत आहे. या कामाबाबत सर्व अधिकारी व लोकप्रतिनिधी यांना सुद्धा माहिती आहे. परंतु ठेकेदार विरुद्ध आजपर्यंत कोणीही अधिकारी अथवा लोकप्रतिनिधींनी तक्रार केलेली नाही किंवा या कामाची तक्रारीची दखल सुद्धा घेतलेली नाही
याबाबत अधिकारी वर्ग व लोकप्रतिनिधी यांची मिली भगत तर नाही ना अशी नागरिकांना चर्चा सुरू आहे
रस्त्याच्या कामाची चौकशी
. सदर कामाची चौकशी होऊन या रस्त्याचे काम त्वरित करण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुका उपाध्यक्ष स्वप्निल वासुदेव चौधरी यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे .

 

Oplus_131072

सार्वजनिक बांधकाम कर्मचारी आणि संबंधित ठेकेदार यांचे दोघांच्या संगणमतीने सदरच्या कामात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार व भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप स्वप्निल चौधरी यांनी केला आहे .सदर रस्त्याचे काम खूप दिवसापासून सुरू आहे. तरी सदरचे काम वेळेत पूर्ण करण्यात यावे तसेच रस्त्यात वापरलेल्या खडी गिट्टी मटेरियल सिमेंट याची योग्य चौकशी करावी व चौकशी अंतीम काही दोष आढळल्यास संबधितांवर नियमानुसार कारवाई करण्यात यावी. सदरचे कामकाज त्वरित व योग्य प्रतीचे मटेरियल वापर करून त्वरित करण्यात यावे. अन्यथा लोकशाही मार्गाने महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असा इशारा स्वप्निल चौधरी यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. निवेदनावर तालुकाध्यक्ष स्वप्नील चौधरी ग्रामीण विभागाचे अध्यक्ष संतोष सुतार यांच्या सह्या आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या