Saturday, February 14, 2026
Homeजळगावभुसावळ येथे महाशिवरात्री निमित्ताने संगीतमय शिव महापुरण कथेचे आयोजन.

भुसावळ येथे महाशिवरात्री निमित्ताने संगीतमय शिव महापुरण कथेचे आयोजन.

भुसावळ येथे महाशिवरात्री निमित्ताने
संगीतमय शिव महापुरण कथेचे आयोजन.

भुसावळ      खानदेश ला युज प्रतिनिधी           महाशिवरात्री निमित्ताने शहरातील कुंदेकेश्वर महादेव मंदिर जय महाकाल प्रतिष्ठान नेब काॅलनी भुसावळ तर्फे सोमवार दिनांक १६ फेब्रुवारी ते २२ फेब्रुवारी पर्यंत भागवताचार्य महंत हभप इंद्रायणी मोरे पाथार्डे (मालेगाव) यांचे
संगीतमय शिव महापुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे.
दररोज सकाळी ५ ते ६ वाजेपर्यंत काकड आरती सांयकाळी ५ ते ६ हरीपाठ रात्री ८ ते १० शिव महापुरण कथा होणार आहे.
सोमवार दिनांक २३ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ ते ३ वाजेपर्यंत महाप्रसादाचा लाभ भाविकांनी घ्यावा असे आवाहन आयोजकांतर्फ करण्यात आले आहे. त्यानंतर
सायंकाळी ५ ते ८ वाजेपर्यंत दिंडी सोहळा व सांयकाळी ८ वाजता काल्याचे किर्तन होणार आहे. कार्यक्रमासाठी राधेश्याम महाराज (लालमाती ) गायक मुकेश महाराज ऑरगन गायक संतोष महाराज यांची साथ लाभणार असुन कार्यक्रमासाठी जय मातृभुमी मंडळ शिव गंगा मंडळ पारा ग्रृप बजरंग चौक अमर मंडळ शिव मुद्रा प्रतिष्ठान रामराज्य चौक यांचे सहकार्य लाभले आहे. ज्या भाविक भक्तांना सप्ताह सोहळ्यात देंगे स्वरूपात मदत करावयाचे असल्यास त्यांनी 93 43 39 54 80 8007141214 व 9175201395 या नंबर वर संर्पक करावा असे आवाहन कुंदकेश्वर महादेव मंदिर जय महाकाल प्रतिष्ठान नेम कॉलनी भुसावळ यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या