येथे आमदार अमोलदादा जावळे यांच्या प्रयत्नातून आयुष्मान कार्ड,श्रम कार्ड, शेतकरी ओळखपत्र,फार्मर आयडी कॅम घेण्यात आला.
यावल खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी दि.१४
यावल रावेर विधानसभा क्षेत्राचे कर्तव्यदक्ष आमदार आदरणीय अमोलदादा जावळे यांच्या प्रयत्नातून शासकीय योजनांबाबत मोफत कॅम्प घेण्यात आला सदर कॅम्प मध्ये ई श्रम कार्ड ,नवीन मतदान कार्ड दुरुस्ती करणे,रेशन कार्ड दुरुस्ती आणि शेतकरी ओळख पत्र आयडी अशा प्रकारच्या समस्यांचे निराकरण करण्यात आले.
आज शनिवार दि.१४ रोजी सदर कॅम्प यावल येथील प्रभाग क्रमांक ११ शबरीवस्ती येथे आयोजित करण्यात आलेला आहे सदर कॅम्पला यावल नगरपालिका भारतीय जनता पार्टीच्या गटनेत्या सौ.नंदाताई महाजन यावल येथील नगरसेवक हेमराज फेगडे, शुभांगी रोशन येवले,सविता विजय नन्नवरे, योगेश चौधरी,उमेश फेगडे,दिलीप वाणी यावल तालुका सरचिटणीस भरत पाटील,मुकेश कोळी,चेतन फेगडे,रोशन येवले,वीर येवले व्यंकटेश बारी इत्यादी पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यासह प्रभागातील स्त्री-पुरुष नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

