Sunday, February 15, 2026
Homeजळगाव येथे इयत्ता बारावी केंद्रसंचालकावर दबाव

 येथे इयत्ता बारावी केंद्रसंचालकावर दबाव

येथे इयत्ता बारावी केंद्रसंचालकावर दबाव.

यावल     खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी              दि.१४
यावल नगरपरिषद संचलित पीएमश्री साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा इयत्ता बारावी परीक्षेचे केंद्रसंचालक श्री एम के पाटील सर यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. १० फेब्रुवारी रोजी इंग्रजी विषयाचा बारावीचा पेपर होता. यावेळी शासन निर्णयानुसार परीक्षा इन कॅमेरा होत असल्याने जे विद्यार्थी कॉपीवर अवलंबून होते त्यांना कॉपी करता आलेले नाही.त्यामुळे विद्यार्थ्यांचा उद्रेक होऊन विद्यार्थ्यांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. तसेच जवळच्या नातेवाईक आहे म्हणून केंद्र संचालक पद कसे दिले गेले यावर प्रश्नचिन्ह निर्माण केले गेले. बोर्डाच्या नियमाप्रमाणे व परिपत्रकानुसार जवळचा नातेवाईक म्हणजे आई-वडील, पती-पत्नी, मुलगा मुलगी, भाऊ-बहीण. बोर्डाच्या नियमानुसार सरांचा जवळचा नातेवाईक परीक्षेला नाही म्हणूनच बोर्डाने नियुक्तीपत्र दिलेले आहे. असे असताना गैरसमज पसरवून मानसिक त्रास देण्याचे काम सुरू आहे. काही विशिष्ट ब्लॉक मध्ये कॉपी करू दिली जात आहे असा आरोप झाल्याने गटशिक्षणाधिकारी व त्यांची संपूर्ण टीम चौकशी कामी विद्यालयामध्ये दाखल झाले. यावेळी सीसीटीव्ही फुटेज बघण्यात आले. यावेळी शिक्षण खात्याचे अधिकारी कर्मचारी व शाळेतील अधिकारी वर्ग उपस्थित होता. इंग्रजी विषयाच्या पेपर परीक्षा दरम्यान पेपर सुरू झाल्यापासून पेपर संपेपर्यंत सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. ब्लॉक मध्ये कोण आले, कोण गेले, वर्गामध्ये कोणी कॉपी आणली का, विद्यार्थी कॉपी करीत आहेत का याबाबतीत निरीक्षण केले गेले. पण यामध्ये काहीही तथ्य आढळले नाही असे खात्रीलायक वृत्त आहे. सदरील दिवशीचे सीसीटीव्ही फुटेज केंद्र संचालक यांनी जतन करून ठेवलेले आहेत.संबंधित ब्लॉक मध्ये कॉपी आलेली दिसत नाही. झालेले सर्व आरोप हे निराधार व नैराश्याच्या भावनेतून आलेले आहेत. इयत्ता बारावीचा पेपर अतिशय कठीण वातावरणामध्ये झाला. कोणत्याही विद्यार्थ्याला कॉपी करता आलेली नाही. इन कॅमेरा परीक्षा होती. याचे खापर केंद्र संचालकाच्या माथी फोडणे चुकीचे आहे. विद्यालयाला नावारुपाला आणत असताना अशाप्रकारे आरोप करून विद्यालयाची प्रतिमा मलिन करणे, केंद्र बंद होईल अशा खोट्या तक्रारी करणे काही तथाकथित स्वतःला समाजसेवक समजणाऱ्या महाशयांनी सुरू केलेले आहे. याबाबतीत केंद्र संचालकाशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले की, खोटे आरोप करणाऱ्या विरुद्ध उच्च न्यायालयामध्ये मानहानीचा दावा केला जाईल. त्याचप्रमाणे इंग्रजीचा पेपर संपल्यावर गोंधळ घालणाऱ्या, दुखावलेल्या रोड रोमियो विरुद्ध त्यांचा परीक्षेशी काही संबंध नाही, ज्यांचे पाल्य परीक्षेला नाही त्यांचे व्हिडिओतील चेहरे पाहून यावल पोलीस स्टेशनला लवकरच गुन्हे दाखल केले जातील. स्थानिक पातळीवर गुन्हे दाखल होत नसल्यास यासंदर्भात उच्च न्यायालयातून दाद मागितली जाईल. कलम 144 चे उल्लंघन, जमावबंदी आदेशाचे उल्लंघन, शाळेमध्ये बेकायदेशीर प्रवेश करणे, सरकारी कामात अडथळा आणणे, जीवे मारण्याची धमकी देणे याबाबतीत भारतीय दंड विधान कलम अंतर्गत येत्या काही दिवसात गुन्हे दाखल करण्याचे केंद्र संचालक यांनी माहिती देताना सांगितले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या