Friday, May 1, 2026
Homeजळगावभुसावळात आता रात्री १० नंतर डीजे, मोठ्या आवाजाच्या वाद्यांवर बंदी !

भुसावळात आता रात्री १० नंतर डीजे, मोठ्या आवाजाच्या वाद्यांवर बंदी !

भुसावळात आता रात्री १० नंतर डीजे, मोठ्या आवाजाच्या वाद्यांवर बंदी !

भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क – भुसावळ शहरात वाढते ध्वनीप्रदूषण व सुव्यवस्थेचे प्रश्न लक्षात घेऊन रात्री १० नंतर डीजे, मोठ्या आवाजातील वाद्यांवर बंदी घालण्यात आली आहे. यासाठी विशेष पोलीस कर्मचारी नेमण्यात आले आहेत

शहरातील वाढती गुन्हेगारी पाहता हद्दपार तसेच एमपीडीए (महाराष्ट्र प्रतिबंधक नजरकैद कायदा) अंतर्गत कारवाईचा नवा प्रस्ताव तयार करण्यात येत आहे. भुसावळ शहर पोलीस स्टेशन आणि बाजारपेठ पोलीस स्टेशन हद्दीतील वारंवार गुन्हे करणाऱ्या १५ संशयितांवर हद्दपार व एमपीडीए अंतर्गत प्रस्ताव पाठविण्याची तयारी सुरू आहे.पोलिसांनी संशयितांची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासून त्यांच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले आहे. सुव्यवस्था धोक्यात आणणाऱ्या आणि दहशत निर्माण करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्यात येणार आहे. गुन्हेगारांची सविस्तर कुंडली तयार केली जात असून, त्यांच्या गुन्ह्यांच्या स्वरूपानुसार कोणावर हद्दपार व कोणाविरुद्ध एमपीडीएची कारवाई करायची, याचे नियोजन केले जात आहे.आठवडाभरात शहर व बाजारपेठ पोलीस ठाण्यांकडून हे प्रस्ताव जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे पाठविण्यात येणार आहेत. ग्रामीण भागातील संशयितांची नावे समाविष्ट करण्याचे काम क्राईम विभागाकडून सुरू आहे, असे पोलिसांनी सांगितले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या