Tuesday, November 24, 2026
Homeगुन्हाखळबळ! २० लाखांच्या खंडणीसाठी मामा-भाच्याचे अपहरण; जळगाव-अकोला पोलिसांची थरारक कारवाई

खळबळ! २० लाखांच्या खंडणीसाठी मामा-भाच्याचे अपहरण; जळगाव-अकोला पोलिसांची थरारक कारवाई

खळबळ! २० लाखांच्या खंडणीसाठी मामा-भाच्याचे अपहरण; जळगाव-अकोला पोलिसांची थरारक कारवाई

जळगाव:     खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी                शहरात एका मोबाईल साहित्य विक्रेत्याचे आणि त्यांच्या भाच्याचे २० लाख रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मात्र, शनीपेठ पोलिसांनी अकोला स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने अवघ्या काही तासांत या गुन्ह्याचा छडा लावत मामा-भाच्याची सुखरूप सुटका केली आहे. या प्रकरणी दोन तरुणांसह एका अल्पवयीन मुलाला पोलिसांनी जेरबंद केले आहे.

नेमकी घटना काय?
फिर्यादी कृष्णकुमार डुंगराराम चौधरी (३२) हे जळगावात मोबाईल साहित्य विक्रीचा व्यवसाय करतात. १५ फेब्रुवारी रोजी आरोपी यश जितेंद्र माकोडे (२२) याने कृष्णकुमार यांचा भाचा गणपतलाल माली (१९) याला ममुराबाद रोडवरील एका घरात डांबून ठेवले. त्यानंतर आरोपीने कृष्णकुमार यांना धमकावून स्वतःच्या दुचाकीवर बसवून अकोला येथे नेले. तिथे दुसरा आरोपी युवराज गणेश पवार (२४) याच्या मदतीने मामा-भाच्याला जिवे मारण्याची धमकी देत २० लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली.

ऑनलाईन व्यवहार अन् पोलिसांची एन्ट्री:
आरोपींनी सुरुवातीला कृष्णकुमार यांच्याकडून १५ हजार रुपये ‘गुगल पे’द्वारे स्वतःच्या खात्यावर वळवून घेतले. त्यानंतर भाच्याला अकोल्यात ओलीस ठेवून कृष्णकुमार यांना २० लाख रुपये आणण्यासाठी जळगावला पाठवले. जळगावात पोहोचताच कृष्णकुमार यांनी हिंमत दाखवून शनीपेठ पोलीस ठाणे गाठले आणि हकीकत सांगितली.

पोलिसांची संयुक्त कारवाई:
घटनेची गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांनी अकोला एलसीबीचे प्रभारी पो.नि. शंकर शेळके यांच्याशी संपर्क साधला. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी अकोल्यातील ताथोड नगर येथील एका घरावर छापा टाकला. या कारवाईत गणपतलाल याची सुरक्षित सुटका करण्यात आली असून यश माकोडे, युवराज पवार आणि एका १५ वर्षीय मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या