Monday, November 23, 2026
Homeआरोग्यगणपूर शिवारात ऊसतोड कामगारांच्या फडावर आरोग्य विभागाची धडक; ८५ जणांची आरोग्य तपासणी...

गणपूर शिवारात ऊसतोड कामगारांच्या फडावर आरोग्य विभागाची धडक; ८५ जणांची आरोग्य तपासणी व जागेवरच उपचार

गणपूर शिवारात ऊसतोड कामगारांच्या फडावर आरोग्य विभागाची धडक; ८५ जणांची आरोग्य तपासणी व जागेवरच उपचार

​मजुरांची कामाची वेळ लक्षात घेता आरोग्य पथकाकडून सायंकाळच्या सत्रात विशेष शिबिराचे आयोजन; मजुरांनी मानले आभार

​ भडगाव खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी सतीश पाटील
पोटाची खळगी भरण्यासाठी स्थलांतरित होऊन आलेल्या ऊसतोड कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांना आरोग्य सेवेपासून वंचित राहू नये, या उदात्त हेतूने चोपडा तालुक्यातील आरोग्य विभागाने एक स्तुत्य पाऊल उचलले आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र हातेड अंतर्गत येणाऱ्या उपकेंद्र ‘आयुष्यमान आरोग्य मंदिर – गणपूर’ परिसरातील ऊसतोड मजुरांच्या फडावर जाऊन राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाच्या (RBSK) पथक क्रमांक ०३ मार्फत सोमवारी (दि. २३ नोव्हेंबर) सायंकाळी विशेष आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.

​जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर आणि माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. रमेश धापते यांच्या आदेशान्वये, तसेच चोपडा तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गिरीश गोसावी आणि हातेड प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विवेक जैस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर पार पडले.

दिवसा मजूर ऊसतोडीच्या कामात व्यस्त असल्याने त्यांची गैरसोय होऊ नये व मजुरी बुडू नये, यासाठी आरोग्य विभागाने जाणीवपूर्वक सायंकाळच्या सत्रात फडावर जाऊन ही सेवा उपलब्ध करून दिली.

​८५ जणांची तपासणी व औषधोपचार:-
या शिबिरात एकूण ८५ जणांची सखोल आरोग्य तपासणी करण्यात आली.


यामध्ये ३ गरोदर माता, ३९ लहान बालके आणि ४३ ऊसतोड मजुरांचा समावेश होता.
तपासणीदरम्यान विविध आजार आढळून आलेल्या रुग्णांना जागेवरच मोफत औषधोपचार देण्यात आले. तसेच, स्थलांतरित मजुरांमध्ये संसर्गजन्य आजारांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून स्वच्छतेचे महत्त्वही समजावून सांगण्यात आले.

​लसीकरण आणि पोषणाबाबत प्रबोधन
यावेळी वरिष्ठ आरोग्य निरीक्षक-विजय देशमुख यांनी मजुरांशी संवाद साधत त्यांना आरोग्यविषयक मार्गदर्शन केले. गरोदर मातांची नियमित तपासणी, सकस आहार आणि बाळाच्या व मातेच्या सुरक्षिततेसाठी १०० टक्के लसीकरण करून घेणे किती आवश्यक आहे, याचे महत्त्व देखील देशमुख यांनी पटवून दिले. व बालकांच्या सुदृढ वाढीसाठी नियमित लसीकरणाबाबत पालकांना प्रोत्साहित करण्यात आले.

​मजुरांकडून आरोग्य पथकाचे कौतुक
ऊसतोडीच्या धावपळीत दवाखान्यात जाणे शक्य होत नसताना, आरोग्य विभागाने थेट फडावर येऊन ‘घरपोच आरोग्य सेवा’ दिल्याने ऊसतोड कामगारांनी समाधान व्यक्त केले.

मजुरांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत संपूर्ण आरोग्य पथकाचे मनापासून आभार मानले.

​यांची होती उपस्थिती
हे शिबिर यशस्वी करण्यासाठी आरबीएसके (RBSK) वैद्यकीय अधिकारी डॉ. राजाभाऊ चव्हाण, डॉ. पूनम पाटील, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक विजय देशमुख, औषध निर्माण अधिकारी (फार्मसिस्ट) दीपक सावंत, आरोग्य सेविका- सौ.सुनिता चौधरी, तालुका कुष्ठरोग पर्यवेक्षक आर.जी.पाटील, आयुष्यमान आरोग्य मंदिराच्या आरोग्य सेविका-श्रीमती जागृती राजपूत आणि आशा वर्कर सौ.उषा सोनवणे आदींनी शिबिर यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या