Wednesday, February 18, 2026
Homeजळगावशहरात मेन रोडवर भाजीपाला मार्केट बांधकाम होणार...

शहरात मेन रोडवर भाजीपाला मार्केट बांधकाम होणार…

शहरात मेन रोडवर भाजीपाला मार्केट बांधकाम होणार…

नगरसेवक सागर चौधरी.

यावल     खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी                    दि.१८   नगरपरिषद कार्यक्षेत्रात भाजीपाला मार्केट नसल्याने तसेच खास करून स्री-पुरुषाच्या दैनंदिन आवश्यक अशी सुविधा प्राप्त होण्यासाठी यावल शहरात मेन रोडवर असलेल्या श्री छत्रपती शिवाजी महाराज कॉम्प्लेक्स जागा रिकामी करून त्या ठिकाणी भाजी मार्केट बांधकाम केले जाणार असल्याने प्रभागातील नगरसेवक सागर सुनील चौधरी,सदस्या सौ. वैशाली निलेश बारी.यांच्या कौतुकास्पद निर्णयाबाबत प्रभागात आणि यावल शहरात आनंद व्यक्त केला जात आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की शहरात नगरपालिका कार्यक्षेत्रात भाजी मार्केट नसल्याने
भाजी विक्रेत्यांना ठिकठिकाणी भर रस्त्यावर बसावे लागत होते यात शहरातील स्री-पुरुष नागरिकांना भाजी खरेदी करण्यासाठी भटकंती करावी लागत होती.भर रस्त्यावर भाजी विक्रेते बसत असल्याने वाहतुकीस रहदारीस सुद्धा मोठा अडथळा निर्माण होत होता.ही दैनंदिन प्राथमिक असुविधा असल्याने सुविधा प्राप्त होण्यासाठी आज
यावल नगरपालिकेच्या झालेल्या प्रथम सर्वसाधारण मीटिंग आयोजित केली या मीटिंगमध्ये नगरसेवक सागर चौधरी आणि वैशाली बारी यांच्या प्रभागात मेनरोडवर असलेले श्री छत्रपती शिवाजी महाराज कॉम्प्लेक्स पाडून त्या ठिकाणी भाजी मार्केट तयार करण्यासाठी महत्त्वाचा विषय घेण्यात आला.त्यामुळे यावल शहरात मेनरोडवरच नवीन आकर्षक असे भाजीपाला मार्केट तयार होणार असल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नगरसेवक तथा गटनेता सागर चौधरी,सदस्या वैशाली बारी यांनी घेतलेल्या कौतुकास निर्णयाचे शहरात सर्व स्तरातून स्वागत होत असून आनंद व्यक्त करण्यात आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या