Friday, May 1, 2026
Homeजळगावजे.टी.महाजन इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली.

जे.टी.महाजन इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली.

जे.टी.महाजन इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली.

यावल    खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी                    दि.१८
आज दि.१८ रोजी येथील व्यास शिक्षण मंडळ संचलित जे.टी. महाजन स्कूल यावल येथे शिवजयंती हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .
कार्यक्रमाची सुरुवात कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ.रंजना महाजन मॅडम यांनी छत्रपती शिवाजी महाराज
याच्या प्रतिमेला हार अर्पण करून केली.
तसेच या कार्यक्रमाला प्राचार्य श्रीमती दिपाली धांडे मॅडम शाळेच्या पर्यवेक्षिका सौ.गौरी भिरूड मॅडम व श्रीमती राजश्री लोखंडे मॅडम यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला सेमी माध्यमाच्या विद्यार्थी व इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थ्यांनी साकेत अभिजीत जाधव,स्वराज मंदार गडे,गार्गी धनराज तळेले,विवेक योगेश लावणे,ओवी विशाल महाजन,तनिष्का प्रवीण चौधरी , प्रितेश प्रशांत बरगे,निखिल श्रीकृष्ण नेहते,समृद्धी निलेश बारी, कल्याणी पंकज बारी,महेश्वरी सुनील कुंभार,सुदिक्षा दिनकर बारी,या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजान बद्दल माहिती सांगितली.सम्यक सौरभ जैन या विद्यार्थ्याने शिवरायां बद्दल माहिती सांगणारे गीत गायले.
तसेच कार्यक्रमात ऋषी नितीन माहूरकर,वेदांत अमृत पाटील,व गायत्री सचिन चौधरी,या विद्यार्थ्यांनी शिवगर्जना सादर केली.
तसेच या कार्यक्रमात हेमाक्षी मनोज पाटील,अंकिता जगदीश गायकवाड,धनश्री राजेंद्र पाटील, या विद्यार्थ्यांनी पोवाडे गायीले.
तसेच शिवराय,जिजामाता,व मावळे इत्यादी व्यक्ती ची वेशभूषा विद्यार्थ्यांनी सादर केली .
तसेच इंग्लिश मीडियमच्या प्राचार्या श्रीमती दिपाली धांडे मॅडम यांनीदेखील मुलांना माहिती उलगडून दिली शिव चरित्र बद्दल.
तसेच शाळेच्या शिक्षिका डिंपल इंगळे मॅडम यांनी देखील शिवरायांबद्दल माहिती दिली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ .प्रीती भंगाळे मॅडम यांनी केले .व आभार प्रदर्शन लक्ष्मी कवडी वाले मॅडम यांनी मानले.
अशा रीतीने शिवजयंती हा कार्यक्रम शाळेत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या