बेपत्ता असलेल्या ५३ वर्षीय व्यक्तीचा विहिरीत आढळला मृतदेह!

<img class

यावल खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क – तालुक्यातील नायगाव येथून बेपत्ता झालेल्या ५३ वर्षीय इसमाचा मृतदेह गुरुवारी शेतातील विहिरीत आढळून आला. याप्रकरणी यावल पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील नायगाव येथील रहिवासी दगडू लोटन पाटील (वय ५३) हे मंगळवारी घरातून कुणालाही न सांगता बाहेर गेले होते. त्यानंतर ते परत न आल्याने कुटुंबीयांनी पोलिस ठाण्यात हरवल्याची तक्रार नोंदवली होती. पोलिसांकडून शोध सुरू असतानाच गुरुवारी नायगाव शिवारातील गट क्रमांक ७४ मधील विहिरीत एक मृतदेह दिसून आला. शेतमजुरांनी ही बाब लक्षात येताच पोलिस पाटलांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह विहिरीतून बाहेर काढून ग्रामीण रुग्णालय, यावल येथे आणला. शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला.

