Sunday, February 22, 2026
Homeगुन्हान्यायालय परिसरात वकिलावर प्राणघातक हल्ला तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

न्यायालय परिसरात वकिलावर प्राणघातक हल्ला तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

न्यायालय परिसरात वकिलावर प्राणघातक हल्ला तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

चाळीसगाव खान्देश लाईव्ह न्युज प्रतिनिधी शहरातील परिसरात एका वकिलावर लोखंडी सुरी व कोयत्याने प्राणघातक हल्ला झाल्याची गंभीर घटना २० फेब्रुवारी रोजी दुपारी सुमारे पावणे तीन वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन येथे तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की जखमी फिर्यादी समीर अफजल शेख (वय ४५, व्यवसाय – वकील, रा. नारायणवाडी, चाळीसगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोर्टात दैनदिन काम करीत असताना आरोपी नाज उर्फ माज आरीफ खाटीक याने फोन करून त्यांची चौकशी केली. आपण कोर्टात असल्याचे सांगताच काही वेळातच आरोपी १) आरीफ रहेमतुल्ला खाटीक, २) दानीश आरीफ खाटीक व ३) नाज उर्फ माज आरीफ खाटीक (सर्व रा. हिरापूर रोड, चाळीसगाव) हे हातात लोखंडी सुरी व कोयता घेऊन कोर्ट परिसरात आले.फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, आरीफ खाटीक याने “आज याला संपवून टाका” असे सांगताच दानीश खाटीक याने सुरीने पोटात वार करण्याचा प्रयत्न केला. मात्र फिर्यादी मागे झाल्याने ते बचावले. त्याचवेळी नाज उर्फ माज खाटीक याने कोयत्याने डोक्यावर वार करण्याचा प्रयत्न केला. फिर्यादीने डावा हात डोक्यावर धरल्याने कोयता हातावर लागून बोटांना दुखापत झाली. जखमी अवस्थेत त्यांना तात्काळ बापजी हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. प्लॉट खरेदी-विक्रीच्या वादातून हा हल्ला झाल्याचे प्राथमिक तपासात कारण समोर आले आहे. या प्रकरणी भा.न्या.सं. (BNS) 2023 अंतर्गत कलम १०९, ११५(२), ४९, ३५२, ३५१(२), ३५१(३), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.घटनेची माहिती वरिष्ठांना देण्यात आली असून पुढील तपास सपोनि शंकर मुटेकर करीत आहेत. शहरातील न्यायालय परिसरात घडलेल्या या घटनेमुळे वकील व नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या