Sunday, February 22, 2026
Homeगुन्हारावेर हादरले! महिलेचा पाठलाग करून विनयभंग आणि जातीवाचक शिवीगाळ

रावेर हादरले! महिलेचा पाठलाग करून विनयभंग आणि जातीवाचक शिवीगाळ

रावेर हादरले! महिलेचा पाठलाग करून विनयभंग आणि जातीवाचक शिवीगाळ

रावेर |  खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
रावेर तालुक्यातील एका गावातील २५ वर्षीय महिलेचा पाठलाग करून तिचा विनयभंग केल्याची आणि जातीवाचक शिवीगाळ करून अपमानित केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून रावेर पोलीस ठाण्यात संशयित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला २१ फेब्रुवारी रोजी पहाटे ५:३० वाजेच्या सुमारास प्रातर्विधीसाठी गावाजवळील रस्त्यावरून जात होती. यावेळी संशयित आरोपी सुरेश बळीराम पाटील याने तिचा पाठलाग केला. महिलेला वाटेत अडवून त्याने अश्लील मागणी केली. “तुला किती पैसे लागतील ते देतो, माझ्यासोबत चल,” असे म्हणत तिचा विनयभंग केला.

जातीवाचक शिवीगाळ आणि मानहानी
पीडित महिलेने आरोपीच्या या कृत्याला कडाडून विरोध केला असता, आरोपीने तिच्या समाजाबद्दल अत्यंत आक्षेपार्ह आणि जातीवाचक शब्द वापरले. “तुमच्या समाजातील स्त्रिया हेच काम करतात,” असे हीन वक्तव्य करून तिची सामाजिक आणि मानसिक मानहानी केली.

पोलिसांत धाव आणि गुन्हा दाखल
या धक्कादायक प्रकारामुळे घाबरलेल्या पीडितेने तात्काळ रावेर पोलीस ठाणे गाठून आपबिती सांगितली. पीडितेच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित आरोपी सुरेश पाटील याच्याविरुद्ध विनयभंग आणि अनुसूचीत जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (ॲट्रॉसिटी) गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस प्रशासन अत्यंत गांभीर्याने करत आहे

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या