थोर समाजसुधारक संत गाडगेबाबा महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी.

भुसावळ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी दि.२३
येथील खान्देश लाईव्हच्या कार्यालयात थोर समाजसुधारक संत गाडगेबाबा महाराज यांची जयंती सर्व स्तरातील समाज बांधव आणि प्रसिद्धी माध्यम प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
हा कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराज कॉम्प्लेक्स येथे पार पडला.यावेळी संत गाडगेबाबा महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.उपस्थित मान्यवरांनी श्री संत गाडगेबाबा महाराज यांच्या जीवनकार्याचा आढावा मांडून

समाजप्रबोधन,स्वच्छता अभियान, अंधश्रद्धा निर्मूलन आणि शिक्षण प्रसारासाठी त्यांनी केलेल्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
कार्यक्रमा प्रसंगी परिट संघटनेचे माजी अध्यक्ष रमेश ठाकरे,बाळू शेलोडे,राहुल रोकडे,पत्रकार संतोष शेलोडे,कमलेश चौधरी,मनोहर लोणे,सुनिल आराक,शाम गोविंदा , सतिष कांबळे,दिपक परदेशी, संजय काशिव,सतिष शिंदे,प्रशांत बोरोले,पवन सोनार आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी रमेश ठाकरे, मनोहर लोणे व सुनिल आराक यांनी संत गाडगेबाबा महाराज यांच्या जीवनचरित्रावर मनोगत व्यक्त करत त्यांच्या विचार आचरणात आणण्याचे आवाहन केले.कार्यक्रमाचे वातावरण श्रद्धा, प्रेरणा आणि सामाजिक सलोखा, बांधिलकीने भारलेले होते.

