Friday, February 27, 2026
Homeजळगावमार्मिक जीवनाचे रहस्य हसत खेळत सांगण्याची कला म्हणजे कुसुमाग्रज - प्रा. डॉ....

मार्मिक जीवनाचे रहस्य हसत खेळत सांगण्याची कला म्हणजे कुसुमाग्रज – प्रा. डॉ. शरद बिऱ्हाडे

मार्मिक जीवनाचे रहस्य हसत खेळत सांगण्याची कला म्हणजे कुसुमाग्रज – प्रा. डॉ. शरद बिऱ्हाडे

फैजपूर : खान्देश लाईव्ह प्रतिनिधी

दि.२७ फेब्रुवारी रोजी ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त साहित्यिक वि. वा. शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांची जयंती “मराठी भाषा गौरव दिना” निमित्त धनाजी नाना महाविद्यालय, फैजपूर येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला मुख्य वक्ते प्रा. डॉ. शरद बिऱ्हाडे तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र वाघुळदे हे होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला वि. वा. शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत करण्यात आला.
यावेळी आपल्या मार्गदर्शनात प्रा. डॉ. शरद बिऱ्हाडे यांनी सरस्वतीच्या मंदिरातील दैदिप्यमान रत्न असा गौरव असलेले वि. वा. शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांच्या साहित्याचा आढावा घेतला. नटसम्राट या प्रसिद्ध नाटकाच्या माध्यमातून घराघरात ही कलाकृती पोहोचवणारे कुसुमाग्रज होते. तसेच कुसुमाग्रजांची प्रेम कर भिल्लासारखं ही कविता आजही तरुणांच्या काळजाचा ठाव घेते. प्रेमाची महिमा गाणारा हा कवी आजही श्रोत्यांना भावतो असे मत व्यक्त केले. अध्यक्ष समारोपात प्राचार्य डॉ. राजेंद्र वाघुळदे यांनी मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त माहिती दिली. मराठी ही केवळ भाषा नाही, तर ती आपल्या संस्कृतीची, परंपरेची आणि अस्मितेची ओळख आहे. संतांच्या अभंगातून, शाहिरांच्या पोवाड्यातून आणि साहित्यिकांच्या लेखणीतून मराठीने आपल्याला विचारांची श्रीमंती दिली आहे. ती टिकवणे ही प्रत्येकाची जबाबदारी असून मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने आपण प्रत्येकाने समृद्ध अशा मराठी साहित्याचे वाचन केले पाहिजे असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. दीपक सूर्यवंशी यांनी केले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. पंकज बोदडे तर आभार डॉ. स्वाती महाजन यांनी केले. कार्यक्रमासाठी प्रा. विजय तायडे, प्रा. उन्नती चौधरी, प्रा. सीमा चौधरी यांनी परिश्रम घेतले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या