Wednesday, September 16, 2026
Homeजळगावभुसावल येथे गुर्जर सम्राट श्री मिहीर भोज यांची जयंती उत्साहात साजरी; समाज...

भुसावल येथे गुर्जर सम्राट श्री मिहीर भोज यांची जयंती उत्साहात साजरी; समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती

भुसावल येथे गुर्जर सम्राट श्री मिहीर भोज यांची जयंती उत्साहात साजरी; समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती

भुसावल   खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
यावल रोडवरील सूर्यमुखी हनुमान मंदिर आणि सेंट लायसेस शाळा परिसrात गुर्जर सम्राट श्री मिहीर भोज राजा यांची जयंती अत्यंत उत्साहात आणि चैतन्यमय वातावरणात साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून कॅबिनेट मंत्री ना. श्री. गुलाबरावजी पाटील साहेब यांचे स्वीय सहाय्यक श्री. नवलसिंग राजे पाटील, कंडारीचे माजी सरपंच डॉ. सूर्यभान पाटील, दोडे गुर्जर समाज अध्यक्ष श्री. संजय पाटील यांच्यासह सह-संचालक मंडळ आणि परिसरातील असंख्य समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन, प्रतिमा पूजन आणि पुष्पहार अर्पण करून झाली. नवलसिंग राजे पाटील आणि डॉ. सूर्यभान पाटील यांच्या हस्ते हे विधिवत पूजन करण्यात आले. त्यानंतर चव्हाण सर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना गुर्जर सम्राट राजा मिहीर भोज यांच्या जीवनकार्यावर, शौर्यावर आणि ऐतिहासिक योगदानावर प्रकाश टाकला.
या विशेष सोहळ्यानिमित्त श्री. नवलसिंग राजे पाटील यांच्या हस्ते उपस्थित सर्व समाज बांधवांना गुर्जर सम्राट राजा मिहीर भोज यांची प्रतिमा भेट म्हणून सन्मानाने देण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन उपस्थितांच्या सहकार्याने पार पडले. समाज बांधवांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा जयंती सोहळा अत्यंत सलोख्याच्या वातावरणात संपन्न झाला.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या