Wednesday, September 16, 2026
Homeजळगावबंसल क्लासेसच्या शिक्षक सन्मान सोहळ्यात मुख्याध्यापक एम. एम. चौधरी यांचा गौरव

बंसल क्लासेसच्या शिक्षक सन्मान सोहळ्यात मुख्याध्यापक एम. एम. चौधरी यांचा गौरव

बंसल क्लासेसच्या शिक्षक सन्मान सोहळ्यात मुख्याध्यापक एम. एम. चौधरी यांचा गौरव

खासदार स्मिताताई वाघ यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान; शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाची दखल

जळगाव     खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी                  बंसल क्लासेस, जळगाव यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘शिक्षक सन्मान सोहळा २०२६’ मध्ये खंडाळा येथील रहिवासी तथा किन्ही सर्वोदय हायस्कूलचे मुख्याध्यापक एम. एम. चौधरी सर यांचा त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल सन्मान करण्यात आला. हा पुरस्कार त्यांना मा. खासदार स्मिताताई वाघ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.शिक्षण क्षेत्रात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न करणारे मुख्याध्यापक एम. एम. चौधरी यांनी शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासोबतच विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, संस्कार, आत्मविश्वास आणि सामाजिक बांधिलकी निर्माण करण्यासाठी विशेष योगदान दिले आहे.

त्यांच्या कार्याची दखल घेत बंसल क्लासेसतर्फे आयोजित या विशेष सोहळ्यात त्यांचा गौरव करण्यात आला.
पुरस्कार स्वीकारताना चौधरी सरांनी हा सन्मान आपल्या कार्याची प्रेरणा वाढविणारा असल्याचे सांगितले. शिक्षक हा केवळ ज्ञान देणारा नसून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाला योग्य दिशा देणारा मार्गदर्शक असतो. विद्यार्थ्यांच्या प्रगतीतच शिक्षकाच्या कार्याचे खरे यश दडलेले असते, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

या सन्मानामुळे खंडाळा परिसरासह किन्ही सर्वोदय हायस्कूलच्या शैक्षणिक वर्तुळात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. चौधरी सरांच्या कार्याचा गौरव झाल्याबद्दल शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक तसेच ग्रामस्थांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.शैक्षणिक क्षेत्रात प्रामाणिकपणे आणि सातत्याने कार्य करणाऱ्या शिक्षकांचा गौरव करणारा बंसल क्लासेसचा हा उपक्रम शिक्षकांच्या कार्याला प्रोत्साहन देणारा ठरला. या सन्मानामुळे मुख्याध्यापक एम. एम. चौधरी यांच्या पुढील शैक्षणिक कार्याला निश्चितच नवी ऊर्जा आणि प्रेरणा मिळणार आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या