वनहक्क दाव्यांच्या सात बारा करीता लोकसंघर्ष मोर्चाची विशेष मोहीम.


भुसावळ, खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
दीनदयाल नगर भुसावळ येथे लोक संघर्ष मोर्चाच्या नेत्या प्रतिभाताई शिंदे यांच्या प्रमुख उपस्थिती सभा संपन्न झाली.
या सभेसाठी बोदवड , मुकाईनगर व भुसावळ येथील आदिवासी बांधव उपस्थित होते. वैयक्तिक आणि “सामूहिक वन हक्काचा दावा ” ग्रामस्थांनी सादर करावी असे सांगितले .
याप्रसंगी प्रतिभाताई शिंदे म्हणाले की जंगलामध्ये किंवा जंगलाच्या लगतच्या परिसरात वास्तव्यास असलेल्या गावांतील ग्रामस्थ जंगलातून वनउपज घेतात, जंगलातील विविध वस्तूंचा पारंपरिक पद्धतीने वापर करतात तसेच काही ठिकाणी वैयक्तिक शेती करतात. अशा ग्रामस्थांच्या वनहक्कांशी संबंधित प्रकरणांचा आढावा घेऊन प्रलंबित दावे निकाली काढण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याचा निर्णय शासनांच्या परीपत्राद्वारे घेण्यात आला.
महाराष्ट्र शासनाने यासंदर्भात काढलेल्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने संबंधित गावांमध्ये वनहक्क दावे, त्यांची कागदपत्रे आणि प्रलंबित प्रकरणांचा आढावा घेण्यात येणार आहे. १७, १८ व १९ सप्टेंबरदरम्यान आढावा घेऊन, २१ सप्टेंबर ते २ ऑक्टोबरदरम्यान ग्रामसभा घेऊन संबंधित दाव्यांचा निर्णय करण्याची प्रक्रिया राबविण्याची मागणी बैठकीत करण्यात आली.
या मोहिमेअंतर्गत २१ सप्टेंबर रोजी भुसावळ व फैजपूर प्रांत भेट घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर भुसावळ व फैजपूर प्रांत अधिकाऱ्यांची भेट घेऊन ग्रामस्थांच्या वनहक्कांबाबत चर्चा करून प्रलंबित दाव्यांवर तातडीने कार्यवाही करण्याची मागणी करण्यात येणार आहे.
दरम्यान, भुसावळ तसेच बोदवड तालुक्यातील एकाही गावाला अद्याप वनहक्काचे अधिकार स्पष्टपणे का देण्यात आलेले नाहीत, असा सवाल लोकसंघर्ष मोर्चाच्या बैठकीत उपस्थित करण्यात आला. संबंधित गावांतील पा�

