पोदार इंटरनॅशनल स्कूल मधे आंतरराष्ट्रीय विज्ञान दिवस व कल्मिनेटिंग इव्हेंट उत्साहात संपन्न.

यावल खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी दि.१ तालुक्यातील अकलूद येथील
पोदार इंटरनॅशनल स्कूल मधे आंतरराष्ट्रीय विज्ञान दिन “ व भव्य कलमिनेटिंग इव्हेंट उत्साहात व दिमाखात साजरा झाला.
कार्यक्रमाची सुरुवात ज्ञानदेवता सरस्वती मातेला पुष्पहार आणि पूजनाने करून झाली. विद्यालयाचे आदरणीय प्राचार्य श्री. सचिन बनसोडे सर यांच्या हस्ते पूजन व उद्घाटन संपन्न झाले.
आंतरराष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त इयत्ता १ ली ते ८ वीच्या विद्यार्थ्यांनी विविध अभिनव व कार्यरत विज्ञान मॉडेल्स सादर केली. विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने आपल्या मॉडेल्सचे सादरीकरण व स्पष्टीकरण केले. विशेष आकर्षण म्हणून इनोव्हेशन लॅबमध्ये विद्यार्थ्यांनी तयार केलेले रोबोट्स उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होते. पालकांनी प्रदर्शनास भेट देऊन विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे व वैज्ञानिक दृष्टिकोनाचे मनापासून कौतुक केले.
तसेच “ फ्रॉम मॅप्स टू ॲप्स – बियाँड द बॉर्डर्स” या थीम अंतर्गत आयोजित समारोप कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी भारत, चीन, नेपाळ, तिबेट, ग्रीस, जपान, जर्मनी, इटली, अमेरिका अश्या विविध देशांची संस्कृती, परंपरा व कला यांचे प्रभावी सादरीकरण केले. इयत्ता १ ली ते ३ रीच्या विद्यार्थ्यांनी भारत, थायलंड, अमेरिका, मेक्सिको, जर्मनी, फ्रान्स, नेपाळ अशा देशांच्या वेशभूषेत आकर्षक रॅम्प वॉक सादर केला, तर इयत्ता ४ थी ते ८ वीच्या विद्यार्थ्यांनी विविध देशांच्या नृत्यप्रकारांचे सादरीकरण करून प्रेक्षकांची मने जिंकली.
या कार्यक्रमात पालक व विद्यार्थ्यांनी मिळून विविध देशांतील स्वादिष्ट शाकाहारी खाद्यपदार्थ, मनोरंजनात्मक खेळांचे स्टॉल्स लावले होते. विविध देशांच्या खाद्यसंस्कृतीचे दर्शन घडविणारा हा उपक्रम सर्वांच्या विशेष पसंतीस उतरला.
कार्यक्रमास पालकांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली. त्यांनी विद्यार्थ्यांच्या सादरीकरणास प्रोत्साहन देत त्यांचे मनोबल वाढविले.
समारोप प्रसंगी आदरणीय प्राचार्य श्री. सचिन बनसोडे सर यांनी विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलता, आत्मविश्वास व परिश्रमांचे कौतुक केले तसेच पालकांचे सहकार्याबद्दल आभार मानले.
विज्ञान, संस्कृती, सर्जनशीलता आणि जागतिक दृष्टीकोन यांचा सुंदर संगम घडवून आणणारे हे दोन्ही कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वर्गाने अथक परिश्रम घेतले.

