Friday, May 1, 2026
Homeजळगावगंगाधर सांडू चौधरी माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा

गंगाधर सांडू चौधरी माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा

गंगाधर सांडू चौधरी माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा

वरणगाव खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी                 वरणगाव ता भुसावळ :
गंगाधर सांडू चौधरी माध्यमिक विद्यालय येथे शनिवार रोजी ‘राष्ट्रीय विज्ञान दिन’ विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढविणे व विज्ञानाबद्दलची जिज्ञासा प्रबळ करणे हा कार्यक्रमामागील मुख्य उद्देश होता.

या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून के. नारखेडे विद्यालय येथील शिक्षक नितीन जनार्दन पाटील उपस्थित होते. त्यांनी “स्पेस अँड टेक्नॉलॉजी” या विषयावर प्रभावी व्याख्यान देत विद्यार्थ्यांना अवकाश संशोधन, उपग्रह तंत्रज्ञान आणि आधुनिक विज्ञानाची प्रगती याबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच राष्ट्रीय विज्ञान दिन का साजरा केला जातो, याची माहिती देताना भारतीय शास्त्रज्ञ सी. व्ही. रमण यांच्या शोधलेल्या ‘रमण इफेक्ट’चे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.
विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला वाव देण्यासाठी पोस्टर मेकिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विज्ञानाशी निगडित विविध संकल्पना विद्यार्थ्यांनी आकर्षक पोस्टरच्या माध्यमातून सादर केल्या.

दुपारच्या सत्रात विद्यालयाच्या उपशिक्षिका श्रीमती डी. पी. भारंबे मॅडम यांनी विज्ञानातील जिज्ञासा वाढविणारे आणि अंधश्रद्धा दूर करणारे प्रात्यक्षिक प्रयोग सादर केले. या प्रयोगांमुळे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण होण्यास मदत झाली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक एम.आर.चौधरी होते.आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी विज्ञानाचे दैनंदिन जीवनातील महत्त्व, तसेच आजच्या युगातील आधुनिक तंत्रज्ञानाची गरज यावर मार्गदर्शन केले. यावेळी विद्यालयाचे पर्यवेक्षक ए. एस. देशमुख, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती डी. पी. भारंबे यांनी केले तर आभार प्रदर्शन श्रीमती एस. बी. कोल्हे यांनी केले. कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाविषयी नवचैतन्य निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या