Friday, March 6, 2026
Homeगुन्हातालुक्यातील सहा जणावंर वर्षभरासाठी हद्दपारीची कारवाई

तालुक्यातील सहा जणावंर वर्षभरासाठी हद्दपारीची कारवाई

तालुक्यातील सहा जणावंर वर्षभरासाठी हद्दपारीची कारवाई

जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क – जळगाव व जामनेर तालुक्यातील सहा जणांवर प्रांताधिकारी विनय गोसावी यांनी वर्षभराच्या कालावधीसाठी हद्दपारीची कारवाई केली आहे. तसेच आदेश जळगाव व पाचोरा पोलिस उपविभागीय अधिकाऱ्यांना बजावण्यात आले आहेत.

मुंबई पोलिस अधिनियम १९५१ चे कलम ५६ व ५७ नुसार फत्तेपूर (जामनेर), रामानंदनगर, जिल्हापेठ, नशिराबाद (जळगाव) पोलिस निरीक्षकांनी आरोपींचा तपशील सादर केला होता. त्यानुसार जळगाव उपविभागाचे पोलिस उपअधीक्षकांनी हद्दपारीचा प्रस्ताव सादर केला होता. त्या प्रस्तावाला प्रांताधिकाऱ्यांनी मान्यता दिली आहे. त्यानुसार सुनील पांडुरंग पारधी, विजय पांडुरंग पारधी (फत्तेपूर), अमोल उर्फ चिक्या शंकर कोकाटे (तडवी गल्ली, हरीविठ्ठलनगर, जळगाव), उमेश उर्फ उमाकांत दत्तात्रय धोबी (संत मीराबाई नगर, पिंप्राळा), महेंद्र उर्फ दादू समाधान सपकाळे (प्रबुद्धनगर, पिंप्राळा) व फिरोज शहा नूर शहा (मोमीन मोहल्ला, नशिराबाद) यांना हद्दपार करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या