Thursday, September 10, 2026
Homeजळगावआज गोजोरा येथे बारागाड्या व यात्रा !

आज गोजोरा येथे बारागाड्या व यात्रा !

आज गोजोरा येथे बारागाड्या व यात्रा !
भुसावळ    खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी             दि 7- येथून जवळच असलेल्या गोजोरा येथे सालाबादप्रमाणे यंदाही ८ मार्च रोजी श्री मरीमाता यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.या निमित्ताने शांताराम दोडे,जिवन जावळे, घनश्याम कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली भगत आत्माराम बाबा दोडे हे बारा गाड्या ओढणार असून त्यांना भुरा सपकाळे व सोपान कोळी हे बगले राहणार आहेत. यात्रेनिमित्त श्री मरीमाता मंदीरात रंगरंगोटी करण्यात आली असून या यात्रेत खेळणी,पाळणे, मिठाई व सौंदर्य प्रसाधने विक्रीसाठी येणार आहेत. यात्रेनिमित्त क्रांती सोनवणे डोणगावकर यांच्या लोकनाट्य तमाशा चे आयोजन करण्यात आले आहे. यात्रेनिमित्त शिलीक दोडे , डिगंबर पाटील, तुषार सपकाळे, संतोष कोळी, संतोष पाटील,भुषण दोडे तसेच ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विकासोचे चेअरमन व संचालक मंडळ तसेच गावातील सर्व ग्रामस्थ तसेच तरुण मित्र मंडळ सहकार्य करीत आहेत . विशेष म्हणजे गावाची यात्रा वर्षातून एकदा येते त्यामुळे बाहेर गावाहून नोकरी निमित्त गेलेले नागरीक गावी येतात त्यामुळे यात्रा शांततेत पार पाडावी असे आवाहन पोलीस पाटील विनोद सपकाळे व सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण कोळी यांनी केले आहे.यात्रे निमित्त भुसावळ तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली कुऱ्हा पानाचे औट पोष्टचे पोलीस कर्मचारी चोख बंदोबस्त ठेवणार आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या