जानकीराम लटकन वाघळे यांचे निधन
आज सकाळी ११ वाजता राहत्या घरून अंत्ययात्रा
भुसावळ. खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
येथील रेल्वे नॉर्थ कॉलनीतील रहिवासी जानकीराम लटकन वाघळे (वय ९०) यांचे गुरुवार, दि. १० सप्टेंबर रोजी दुपारी ४.१५ वाजता निधन झाले. त्यांच्या निधनाने वाघळे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, नातेवाईक व परिचितांकडून शोक व्यक्त करण्यात येत आहे.
जानकीराम वाघळे यांच्या पश्चात चार मुले, दोन मुली, सुना, जावई आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. ते रविंद्र, सुभाष, अनिल व प्रमोद वाघळे यांचे वडील होत.
त्यांची अंत्ययात्रा आज शुक्रवार, दि. ११ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता त्यांच्या राहत्या घरून निघणार आहे.

