Thursday, September 10, 2026
Homeजळगावअतिक्रमण कारवाई नियमानुसार राजकारण करण्यापूर्वी विरोधकांनी वस्तुस्थितीचा अभ्यास करावा ; लोकनियुक्त अध्यक्षा...

अतिक्रमण कारवाई नियमानुसार राजकारण करण्यापूर्वी विरोधकांनी वस्तुस्थितीचा अभ्यास करावा ; लोकनियुक्त अध्यक्षा छायाताई पाटील.

अतिक्रमण कारवाई नियमानुसार राजकारण करण्यापूर्वी विरोधकांनी वस्तुस्थितीचा अभ्यास करावा ; लोकनियुक्त अध्यक्षा छायाताई पाटील.

​यावल  खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
यावल नगरपालिकेकडून काढण्यात आलेल्या अतिक्रमण विरोधी नोटीस आणि त्यावरून सुरू असलेल्या वादावर लोकनियुक्त नगराध्यक्ष सौ. छायाताई अतुल पाटील यांनी स्पष्टीकरण दिले आहे. प्रशासनाने केलेली कारवाई पूर्णपणे नियमानुसार असून, विरोधकांनी केवळ राजकीय श्रेयासाठी या विषयाचे राजकारण करू नये,असा घणाघाती आरोप त्यांनी पत्रकार परिषदेत केला.

​बातमीतील महत्त्वाचे मुद्दे:
​२५ सप्टेंबरनंतर कारवाई
पोळा आणि आगामी गणेशोत्सवाच्या काळात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, तसेच पोलीस पोलिस प्रशासनावरील ताण लक्षात घेता, ही अतिक्रमण कारवाई २५ सप्टेंबरनंतर करण्याचा निर्णय नगरपालिका आणि पोलीस प्रशासनाच्या संयुक्त बैठकीत घेण्यात आला आहे.

​कायदेशीर अधिकार मुख्याधिकाऱ्यांकडे :
‘महाराष्ट्र नगरपरिषदा अधिनियम १९६५’ च्या कलम १७९, १८० आणि १८३ अन्वये सार्वजनिक रस्ते व जागांवरील अतिक्रमणे हटवण्याचा पूर्ण अधिकार मुख्याधिकारी व नगरपालिका प्रशासनाला आहे.यासाठी NHAI किंवा PWD च्या स्वतंत्र आदेशाची गरज नसते.
​विरोधकांचे आरोप बिनबुडाचे: फैजपूर व रावेर नगरपालिकेतही अशाच प्रकारे प्रशासकीय नियमांनुसार अतिक्रमणे हटवण्यात आली आहेत. मग यावलसाठी वेगळे नियम कसे? असा सवाल करत विरोधकांनी वस्तुस्थितीचा अभ्यास न करता आरोप केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

​श्रेयाचे राजकारण बंद करा : शहरात चांगले काम झाले की आमदारांनी श्रेय घ्यायचे आणि अडचण आली की खापर सत्ताधाऱ्यांवर फोडायचे,असा केविलवाणा प्रयत्न सुरू असल्याचा टोला त्यांनी लगावला.​अतिक्रमणधारकांनी थेट प्रशासनाकडे बाजू मांडल्यामुळेच काही राजकीय मंडळींचा “तीळपापड” झाला असून, शहराच्या हितासाठी कायदेशीर मार्गाने होणाऱ्या प्रत्येक प्रशासकीय कारवाईला आपला पूर्ण पाठिंबा असल्याचे नगराध्यक्ष छायाताई पाटील यांनी नमूद केले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या