Saturday, March 7, 2026
Homeजळगावछत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान शिबिर टप्पा क्रमांक १ संपन्न

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान शिबिर टप्पा क्रमांक १ संपन्न

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान शिबिर टप्पा क्रमांक १ संपन्न

वरणगाव  खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
वरणगांव महसुल मंडळ अंतर्गत छ . शिवाजी महाराज महाराजस्व अभियान टहाकळी येथे संपन्न झाले .
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री माननीय संजय सावकारे उपस्थित होते तसेच अध्यक्षस्थानी तहसीलदार नीता लबडे होत्या .
पंचक्रोशीतील ७८० गावकऱ्यांनी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रीती लुटे यांनी केले व आभार प्रदर्शन मंगेश पारिसे यांनी केले .
यावेळी नायब तहसीलदार पूजा अवघडे ,शोभा घुले ,हेमंत गुरव ,जितेंद्र पाडवी, रोशना रेवतकर तसेच सर्व ग्राम महसूल अधिकारी, महसूल सेवक आणि मंडळ अधिकारी आणि कार्यालयीन कर्मचारी, तसेच कृषी विभागाचे अधिकारी भूमी अभिलेख कार्यालयाचे अधिकारी महिला व बालविकास कार्यालयाचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी नागरिकांना लाभ दाखले वाटप करण्यात आले तसेच नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या आणि त्यांच्याकडून अर्ज स्वीकारण्यात आले, तसेच उपस्थित असलेले सेतू सुविधा केंद्र चालकांनी आधार किटच्या सहाय्याने आधार अद्यावतीकरण केले तसेच उत्पन्न प्रमाणपत्र आणि इतर दाखल्यासाठी लागणारे अर्ज नागरिकांकडून भरून घेण्यात आले.
कार्यक्रमामध्ये नायब तहसीलदार संतोष विनंते यांनी अकृषिक कायद्यात झालेल्या बदलाबाबत मार्गदर्शन केले तसेच संजय गांधी निराधार योजना श्रावणबाळ योजना आणि इंदिरा गांधी निवृत्ती पेन्शन योजना ह्या सर्व योजनांची माहिती नागरिकांना सविस्तर देण्यात आली व दिव्यांग बंधू आणि भगिनींना UDID कार्ड काढणे बाबत आवाहन करण्यात आले. माननीय वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी शेतकऱ्यांनी पानंद रस्ते मोकळे करण्यासाठी कोणताही अडथळा आणू नये असे आवाहन केले तसेच कृषी विकासाच्या चालनेला भर देण्यासाठी बळीराजा पानंद रस्ते मोहिमेअंतर्गत सर्व पानंदरस्त्यांचे खडीकरण करण्यात येईल असे आश्वासन दिले.
शिबिरात विशेष सहाय्य योजना लाभ,
लक्ष्मी मुक्ती योजना लाभ ,ई शिधापत्रिका ,
शालेय विद्यार्थ्याना दाखले वाटप ,
उत्पन्न,जात,अधिवास प्रमाणपत्र वाटप ,
ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र ,
३६ ३६ अ नोंदी घेतलेले ७/१२ ‘
अपाक शेरा कमी तसेच जिवंत ७/१२ ,
प्रलंबित फेरफार निर्गती ,
वर्ग २ चे वर्ग १ – चे ७/१२ वाटप
तुकडा शेरा कमी करणे ,खाते एकत्रीकरण
आदी कामे करून दाखले देण्यात आले आहे .

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या