Friday, May 1, 2026
Homeजळगावजागतीक महिला दिनानिमित्त लोकनियुक्त नगरपरिषद अध्यक्षा, नगरसेविकांसह स्रीरोग तज्ञ डॉ.कल्पना कोळी यांचा...

जागतीक महिला दिनानिमित्त लोकनियुक्त नगरपरिषद अध्यक्षा, नगरसेविकांसह स्रीरोग तज्ञ डॉ.कल्पना कोळी यांचा सत्कार.

जागतीक महिला दिनानिमित्त लोकनियुक्त नगरपरिषद अध्यक्षा, नगरसेविकांसह स्रीरोग तज्ञ डॉ.कल्पना कोळी यांचा सत्कार.

ज्येष्ठ नागरिक मंडळाचा सामाजिक स्तुत्य उपक्रम.

यावल   खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी                       दि.८
येथील श्री महर्षी व्यास जेष्ठ नागरिक मंडळातर्फे नवनिर्वाचित यावल नगरपरिषद लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ.छायाताई पाटील तसेच न.पा.सदस्या सौ.कल्पना दिलीप वाणी,सौ.वैशाली निलेश बारी,सौ.नंदा राजेंद्र महाजन,
सौ.वर्षा नीरज चोपडे यांच्यासह स्रीरोग तज्ञ डॉ.कल्पना शंतनु कोळी ( देशपांडे ) यांच्या निवासस्थानी प्रत्यक्ष जाऊन आपुलकीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.यावेळी नगराध्यक्षा सौ.छायाताई अतुल पाटील यांनी ज्येष्ठ नागरिक मंडळाचा आशीर्वाद युक्त सत्कार स्विकारून जेष्ठ नागरिक मंडळ सदस्यांचे आभार मानून जेष्ठ नागरिक मंडळा
ची प्रशंसा करून वडीलधारी ज्येष्ठ नागरिकांचे आभार व्यक्त केले. तसेच नवनिर्वाचित नगरसेविका सौ.नंदा महाजन,सौ.कल्पना वाणी,सौ.वैशाली बारी,सौ.वर्षा निरज चोपडे यांचा सत्कार केला.महिला दिनानिमितत सत्कार केल्याबद्दल त्यांनी आभार मानून जेष्ठ नागरिक मंडळाची माहिती करून घेतली. त्याच प्रमाणे निरामय हाॅसपिटलचे डाॅ.कल्पना शंतनु कोळी ( देशपांडे ) महिला डाॅकटर यांचाही सत्कार करण्यात आला.ललिता पांडुरंग नेरकर यांनी मॅथेमॅटिकस मध्ये पीएच डी करून डॉक्टरेट पदवी मिळवली तसेच नेट सेट परिक्षेत यश संपादन केल्या बद्दल तिचाही महिला दिनानिमित्त सत्कार करण्यात आला.तिने सुध्दा आभार मानले.अशा रितीने ईतर दोन तीन सभासद गृहीणींचा सत्कार करण्यात आला.यावेळेस कार्यक्रमा साठी मंडळाचे कार्यकारिणी सदस्य रमेश बोंडे,
पंडित अप्पा गुरव,सुरेश नेटके,
बंगले सर, झोपे नाना यांनी सहकार्य करून जागतिक महिला दिन साजरा करीत सामाजिक स्तुत्य उपक्रम राबविला.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या