Monday, March 9, 2026
Homeजळगावमुक्ताईनगर काल दिनांक 6 मार्च रोजी शहरातील प्रभाग क्रमांक ४ मधील ईदगाह...

मुक्ताईनगर काल दिनांक 6 मार्च रोजी शहरातील प्रभाग क्रमांक ४ मधील ईदगाह परिसरात सुरू असलेल्या अवैध उत्खननाचा प्रकार नागरिकांच्या सतर्कतेमुळे उघडकीस आला.

मुक्ताईनगर काल दिनांक 6 मार्च रोजी शहरातील प्रभाग क्रमांक ४ मधील ईदगाह परिसरात सुरू असलेल्या अवैध उत्खननाचा प्रकार नागरिकांच्या सतर्कतेमुळे उघडकीस आला.
मुक्ताईनगर खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी             नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन अवैध उत्खनन करत
असलेले चार डंपर व एक मोठे पोकलेन पकडून ते मुक्ताईनगर तहसील कार्यालयासमोर आणून मुक्ताईनगर पोलिसांच्या ताब्यात दिले होते. मात्र तहसीलदार गिरीश वखरे यांनी सदरील वाहनांची चौकशी न करता, मुरूम उत्खननाचे परमीट न तपासता सुट्टीच्या दिवशी शनिवारी सोडून देण्याचे आदेश दिले, ज्यामुळे संबंधित कंत्राटदार बीएन अग्रवाल कंपनीने त्यांचे चार डंपर वर पोकलेन घेऊन निघून गेल्याचा आरोप संबंधित डंपर पकडून आणणाऱ्या नागरिकांनी केला आहे. या घटनेमुळे मुक्ताईनगर शहराततील सुज्ञ नागरिकांनी महसूल प्रशासनाविषयी संताप व्यक्त केला असून कंत्राटदारावर प्रशासन मेहेरबान आहे का ? असा प्रश्न आता नागरिक विचारू लागले आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या