वरणगाव येथे भटके विमुक्त समाज बांधवांची बैठक संपन्न.
वरणगाव खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी वरणगाव ता भुसावळ
येथे नुकतेच भटके विमुक्त समाज बांधवांची बैठक आयोजित करण्यात आली होती.
सदर बैठक ही राज्याचे भटके विमुक्त समाजाचे नेते रवींद्र गायकवाड व अरुण धनगर यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न झाली.
यावेळी भटके विमुक्त समाजातील सुशिक्षित बेरोजगार, महिला बचत गट, विविध शासकीय योजना समाज बांधवापर्यंत पोहोचविण्यात यावे, भटके विमुक्त समाजाला बिनव्याजी कर्ज शासनामार्फत व्यवसाय साठी उपलब्ध करून द्यावे, धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करण्याबाबत शासन दरबारी प्रयत्न करणे. आदी प्रमुख मागण्या बाबत मार्गदर्शन व चर्चा करण्यात आली.
याप्रसंगी समाजसेवक रवींद्र गायकवाड, अरुण धनगर, भगवान वंजारी, रफिक भाई पठाण, राजाराम वंजारी, हरचंद भोई, परशुराम गुंमळकर, घनश्याम भुते, सतीश पर्वते, वाल्मीक जाधव,व महिला आघाडीच्या भारती कापसे, संध्या पवार तसेच कृष्णा शिंदे, तुषार बाबर, पांडुरंग कलनोर, राजेश बाबर, आनंद शिंदे, पंकज गुंमळकर , राजेश करनोर, अनिल शिंदे, दीपक कन्नोर, आनंद माळवे, नवल शिंदे, आदी प्रमुख भटके विमुक्त बहुजन संघाचे पदाधिकारी व समाज बांधव बहुसंख्येने उपस्थित होते.

