भुसावळ येथे प्रतिष्ठा महिला मंडळातर्फे महिला दिनानिमित्त प्रेरणादायी कार्यक्रम संपन्न
भुसावळ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून भुसावळ येथील प्रोफेसर कॉलनीतील बियाणी स्कूल येथे प्रतिष्ठा महिला मंडळाच्या वतीने प्रेरणादायी महिला दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. देशातील थोर महिलांच्या जीवनकार्यावर आधारित नाटिकांचे सादरीकरण करून स्त्री शक्तीचा संदेश देण्यात आला. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.
कार्यक्रमात महिलांनी झाशीची राणी लक्ष्मीबाई, राजमाता जिजाऊ, अंतराळवीर कल्पना चावला , सवित्रीबाई फुले .यांसारख्या महान महिलांची वेषभूषा करून त्यांच्या कार्याची आठवण करून दिली. स्वातंत्र्यलढा, संस्कार आणि आधुनिक काळातील कर्तृत्व या विविध अंगांनी महिलांचे योगदान अधोरेखित करण्यात आले.

कार्यक्रमात सादर करण्यात आलेल्या नाटिकांमधून प्रभावी संदेश देण्यात आला. महाभारतातील द्रौपदीच्या प्रसंगाच्या माध्यमातून आजच्या स्त्रीने स्वतः सक्षम होण्याची गरज अधोरेखित करण्यात आली. तसेच कल्पना चावला यांच्या जीवनप्रवासावर आधारित नाटिकेतून “स्वप्न मोठी असतील तर आकाशही ठेंगणे ठरते” हा प्रेरणादायी संदेश देण्यात आला.
राजमाता जिजाऊ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना दिलेल्या संस्कारांचे महत्त्वही नाटिकेतून मांडण्यात आले. समाजातील जाती-पातीच्या बंधनांमुळे प्रगतीला अडथळा निर्माण होत असल्याचा सूचक संदेश देत समाजाने एकजूट ठेवण्याचे आवाहन करण्यात आले.
कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे लकी ड्रॉद्वारे सहा सखींना पैठण्या, दोन चांदीची नाणी तसेच २५ आकर्षक बक्षिसांचे वितरण करण्यात आले. तसेच रोटरी क्लब व गोदावरी हॉस्पिटल यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरालाही उत्स्फू�

