लाखोंचा मांडव ,चमकोगिरी जास्त परंतु प्रसिद्धी माध्यमांना जागा कुठे.? पाडळसे येथील नियोजनाचा बोजवारा…
लाखोची उपस्थिती समाधान मात्र बोटावर मोजण्या इतक्या भाविकांचे.
भुसावळ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी दि 10
यावल तालुक्यातील पाडळसा (अकलूद शिवार) येथे सुरू असलेल्या कथाकार आंतरराष्ट्रीय पंडित प्रदीप मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथेसाठी यांच्या कथेसाठी कोट्यवधींचा खर्च आणि चोख नियोजनाचे दावे करण्यात आले.मात्र कथेच्या पहिल्याच दिवशी ‘ लोकशाहीचा चौथा स्तंभ’ असलेल्या प्रसिद्धी माध्यमांना तथा पत्रकारांना साधे आमंत्रण सुद्धा नाही आणि इतर बाबतीत चमकोगिरी जास्त असताना लाखोच्या संख्येने उपस्थिती असली तरी प्रत्यक्षात मात्र बोटावर मोजण्या इतक्या भाविकांचे समाधान होत असल्याने कोट्यावधी रुपयांच्या खर्चाबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
कथेमध्ये बसण्यासाठी साधी जागाही न मिळाल्याने आयोजकांचा ‘अतिथी देवो भव’चा नारा फोल ठरला आहे.प्रसिद्धी हवी, पण प्रतिनिधी नकोत का? असा संतप्त सवाल आता विचारला जात आहे.
अकलूद शिवारात सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कथाकार पंडित प्रदीपजी मिश्रा यांच्या ‘श्री शिवमहापुराण’ कथेच्या पहिल्याच दिवशी नियोजनातील त्रुटी समोर आली आहे. या भव्य सोहळ्याचे वार्तांकन करण्यासाठी आलेल्या पत्रकारांसाठी आयोजकांकडून कोणतीही स्वतंत्र बैठक व्यवस्था करण्यात आली नसल्याने पत्रकारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
माध्यम प्रतिनिधींची गैरसोय
कथेसाठी लाखो भाविकांची गर्दी होत असताना, या सोहळ्याला प्रसिद्धी देणाऱ्या माध्यम प्रतिनिधींसाठी व्यासपीठासमोर किंवा प्रेस गॅलरीमध्ये बसण्याची कोणतीही सोय करण्यात आली नव्हती. अनेक पत्रकारांना उभ्याने किंवा गर्दीतून मार्ग काढत वार्तांकन करावे लागले. आंतरराष्ट्रीय स्तरावर या कथेचे प्रक्षेपण होत असताना स्थानिक पत्रकारांच्या बैठकीकडे दुर्लक्ष केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
नियोजनावर प्रश्नचिन्ह
कथेपूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत चोख नियोजनाचे दावे करण्यात आले होते, मात्र प्रत्यक्ष कथा सुरू झाल्यावर पत्रकारांना साधी बसण्याची जागाही उपलब्ध करून देण्यात आली नाही. वार्तांकन करताना येणाऱ्या अडचणींबाबत पत्रकारांनी आयोजन समितीकडे विचारणा केली असता समाधानकारक उत्तर मिळाले नाही, यामुळे पत्रकारांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.
प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न
जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनाने आढावा बैठक घेऊनही, माध्यम प्रतिनिधींच्या मूलभूत व्यवस्थेकडे आयोजकांनी दुर्लक्ष केल्यामुळे या प्रकरणाची चर्चा कथास्थळी रंगली आहे. आगामी दिवसांत पत्रकारांसाठी स्वतंत्र आणि सुव्यवस्थित बैठक व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी उपस्थित पत्रकारांनी केली आहे.
पाडळसे अकलूज येथील शिवपुराण कथे मुळे रस्ता बंदीसाठी पोलीस अधीक्षकांनी कोणालाही विश्वास न घेतांनाअचानक रस्ता बंदीचा निर्णय कसा काय घेतला शेतामध्ये जाण्यासाठी शेतकऱ्यांचे हाल होताना दिसत आहे तसेच न्हावी, आमोदा, बामनोद, फैजपूर आधी परिसरातील विद्यार्थी भुसावल मध्ये शिक्षण घेण्यासाठी येत असतात त्यामुळे विद्यार्थ्यांचे रस्ता बंदीमुळे दिसत आहे त्याचप्रमाणे रावेर यावल खेडगावातील नागरिक रोजचे हजारो ने प्रवास करत असतात त्या प्रवासात अडथळा आल्यामुळे प्रवासी नागरिक खूपच नाराजी व्यक्त करीत आहेत एक व्यक्तीने हा शिवपुराण कथा सप्ताह ठेवला असून त्याला एवढा शासनाचा प्रतिसाद का असे अनेक नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे

