ह्यूमन पेपिलोमा व्हायरस मोहीम लसीकरण बाबत जनजागृती करावी – गटनेत्या वर्षा चोपडे.
यावल खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी दि.१३
ह्यूमन पेपिलोमा व्हायरस हा एक सामान्य व्हायरस आहे. याबाबत काही ठिकाणी वेगवेगळ्या अफवा पसरत असल्याने शासनाच्या वतीने ठिकठिकाणी जनजागृती करून मार्गदर्शक माहिती प्रसारित करण्याची मागणी यावल नगरपालिका गटनेच्या वर्षा आकाश चोपडे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट युवक तालुकाध्यक्ष आकाश चोपडे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्त्यांनी यावल तहसीलदार सौ.मोहनमाला नाझीरकर यांना लेखी निवेदन देऊन मागणी केली.
हा वायरस प्रामुख्याने त्वचा-ते-त्वचा संपर्काने किंवा लैंगिक संपर्काने पसरतो. जगभरात अनेक लोकांना आयुष्यात कधीतरी हा व्हायरस होऊ शकतो.
HPV म्हणजे काय ? –
HPV हा व्हायरसांचा एक मोठा गट आहे ( १०० पेक्षा जास्त प्रकार ).काही प्रकार त्वचेवर मस्से (warts) निर्माण करतात.
काही प्रकार गंभीर आजार, विशेषतः कॅन्सर होण्याचा धोका वाढवतात.
कसा पसरतो .?-
लैंगिक संपर्क (योनी, गुदद्वार किंवा तोंडी संबंध) त्वचा-ते-त्वचा जवळचा संपर्क क्वचित प्रसंगी संक्रमित आईकडून बाळाला
लक्षणे–बर्याच वेळा लक्षणे दिसत नाहीत, पण काही वेळा:
जननेंद्रियावर मस्से (warts)
खाज,जळजळ महिलांमध्ये गर्भाशयाच्या मुखाशी (cervix) बदल कोणते आजार होऊ शकतात? HPV च्या काही प्रकारांमुळे पुढील कॅन्सरचा धोका वाढतो: गर्भाशयाचा कॅन्सर (Cervical cancer)
गुदद्वाराचा कॅन्सर घसा किंवा तोंडाचा कॅन्सर जननेंद्रियाचा कॅन्सर अशी लक्षणे आहेत.
महत्वाचे: HPV हा सामान्य व्हायरस आहे, पण योग्य लस आणि तपासणी केल्यास गंभीर आजार टाळता येतात.तरी याबाबत जनजागृती नसल्यामुळे विपरीत परिणाम होऊ शकतो. आणि याबाबत ठिकठिकाणी चुकीच्या अफवा पसरविल्या जात असून याबाबत जागतिक आरोग्य संघटनेने देखील स्पष्ट केले असून या लसीमुळे कुठलाही धोका नाही लसीकरण पूर्णपणे सुरक्षित व प्रभावी आहे तरी याबाबत तालुक्यात आपल्या स्तरावर आपण जनजागृती करावी व माहितीपत्र व चलचित्र संदेशाद्वारे नागरिकांना महिलांना माहिती द्यावी. तहसीलदार यांना निवेदन देताना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट गटनेत्या सौ.वर्षा चोपडे,राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष आकाश चोपडे
उपजिल्हाध्यक्ष जुगल पाटील, शहराध्यक्ष योगेश पाटील, सेना विद्यार्थी सेनाशहराध्यक्ष प्रेम देवरे, गोलू महाजन,किरण महाजन, रोहित महाजन,वैभव कोळी,गोलू कोळी, योगेश कोळी, जुनेद खान, अल्तमस शेख इत्यादी राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

