Thursday, November 21, 2024
Homeजळगावशेतकरी कष्टकरी बांधवांच्या विविध मागण्यासाठी बोदवड येथील तहसील कार्यालयासमोर महाविकास आघाडीचे लाक्षणिक...

शेतकरी कष्टकरी बांधवांच्या विविध मागण्यासाठी बोदवड येथील तहसील कार्यालयासमोर महाविकास आघाडीचे लाक्षणिक उपोषण.

शेतकरी कष्टकरी बांधवांच्या विविध मागण्यासाठी बोदवड येथील तहसील कार्यालयासमोर महाविकास आघाडीचे लाक्षणिक उपोषण.

ॲड.रोहिणीताई खडसे,ॲड.रवींद्र भैय्या पाटील यांची उपस्थिती.

यावल दि.२१ ( खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
बोदवड तालुक्यातील शेतकरी, कष्टकरी बांधवांच्या विविध मागण्या तात्काळ सोडविण्याबाबत माननीय शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे व महाविकास आघाडीचे बोदवड तालुक्यातील पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आज आक्रमक पवित्रा घेत बोदवड तहसील समोर एक
दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले. लाक्षणिक उपोषणार्थींची
ॲड.रोहिणीताई खडसे,ॲड.रवींद्र भैय्या पाटील भेट देऊन पुढील कार्यवाही केली.
आज बुधवार दि.२१ ऑगस्ट २०२४ रोजी बोदवड येथील तहसील कार्यालय समोर लाक्षणिक उपोषणकर्त्यांनी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,आपला देश हा कृषिप्रधान देश म्हणून ओळखला जातो परंतु सध्याचे सत्ताधारी हे कृषी क्षेत्राकडे
आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत असुन त्यामुळे शेतकरी बांधव,कष्टकरी बांधव मेटाकुटीला आले आहेत.त्यांचे प्रश्न लवकरात लवकर सोडविण्यात यावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि महाविकास आघाडी तर्फे या एक दिवसीय लाक्षणिक उपोषण आंदोलन करण्यात येत आहे आम्हा आंदोलन कर्त्यांच्या प्रमुख मागण्या खालील प्रमाणे आहेत.
अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्याचे,पंचनामे झालेली नुकसान भरपाई त्वरित मिळावी. तसेच ओला दुष्काळ जाहीर करावा.
शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी मिळावी.नियमित कर्ज फेड करणा-या सर्व शेतकरी बांधवांचे प्रोत्साहन अनुदान तात्काळ मिळावे.
शेतातील वीज पंपाचे १५ HP पर्यंतचे विजबिल माफ करावे.
शेतकऱ्यांचं पांढरं सोनं कापूस ह्या पिकला १२ हजार रुपये प्रमाणे हमीभाव मिळावा.केळी,ज्वारी, मका,आदी शेती पिकांना हमखास हमी भाव मिळावा.केळी आणि इतर पिकांसाठी मागील वर्षी न मिळालेली पीक विम्याची रक्कम तात्काळ शेतकऱ्यांना मिळावी.
केळी,सोयाबीन,कापूस व इतर पिक उत्पादक शेतक-याना पिक विमा मिळण्यासाठीच्या जाचक अटी
कमी करुन सरसकट शेतकऱ्यांना पिक विम्याची रक्कम तात्काळ द्या.
रासायनिक खते, औषधे,बी-बियाणे यांचे दर कमी करून त्यावरील संपूर्ण GST रद्द करावा.बंद केलेली पोखरा योजना तात्काळ सुरु करावी.रखडलेले ठिबक सिंचन तुषार सिंचनचे अनुदान तात्काळ द्या.महा डिबीडी वर अर्ज केलेल्या शेतकऱ्यांची सोडत प्रक्रिया पूर्ण करुन पुर्वसंमत्या द्या.चक्रीवादळाने शेतातील पडलेले विजेचे पोल व डी.पी.तात्काळ सुरु करा.दुध उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान मिळावे.शेतक-यांना सिंचनासाठी ( विहीर, बोअरवेल ) अनुदान मिळावे.महिला आणि मुलींवर अत्याचाराच्या घटना घडू नये यासाठी पोलीस यंत्रणा अधिक
मजबूत आणि सुसज्ज करावी.
जल जीवन मिशन योजना अद्याप एकही पूर्ण झालेली नाही,ती लवकरात लवकर पूर्ण करून सुरु करावी.मोदी आवास योजना, प्रधानमंत्री आवास योजना, शबरी आवास योजना व रमाई आवास योजनेत सुरु असलेल्या घरकुलांची रक्कम तात्काळ अदा करा तसेच सदर अनुदान वाढवून द्या,संजय गांधी निराधार,इंदिरा गांधी निराधार श्रावण बाळ योजना,राष्ट्रीय वृद्धापकाळ योजनेचे सहा
महिन्यापासून न मिळालेले लवकरात लवकर वितरीत करावे व नवीन प्रकरणे मंजूर करावीत.
तरी आपण या शेतकरी व कष्टकरी बांधवांच्या हिताच्या मागण्या शासन प्रतिनिधी म्हणून मुख्यमंत्री,
उपमुख्यमंत्री,व संबंधित मंत्री महोदयां पर्यंत पोहचवून त्या लवकरात लवकर सोडविण्यात याव्यात हि विनंती,अन्यथा भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि महाविकास आघाडी तर्फे तिव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी असे दिलेल्या निवेदनावर ॲड.रोहिणीताई खडसे यांच्यासह ॲड.भैय्यासाहेब रवींद्र पाटील,
राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष आबा पाटील उर्फ प्रशांत पाटील, नगरसेवक भरत पाटील दिलीप पाटील पुरुषोत्तम पाटील विलास देवकर अरविंद चौधरी ज्ञानेश्वर पाटील बाबुराव राऊत यांच्यासह महाविकास आघाडीचे ३० ते ४० पदाधिकारी,कार्यकर्ते, यांच्यासह शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या