Monday, July 6, 2026
Homeगुन्हादुकानाचा कडीकोंडा तोडून चोरट्यांनी किरणा सामान केला लंपास!

दुकानाचा कडीकोंडा तोडून चोरट्यांनी किरणा सामान केला लंपास!

दुकानाचा कडीकोंडा तोडून चोरट्यांनी किरणा सामान केला लंपास!

Oplus_131072

<img class

चाळीसगाव खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क – चाळीसगाव शहरातील देशमुख-राजपूत स्मशान भूमीसमोरील किराणा मालाच्या एजन्सी असलेल्या दुकानातून चोरट्यांनी दरवाजाचा कडीकोेंडा व कुलुप तोडून 47 हजार रूपये किंमतीचे किराणा साहित्य चोरून नेले. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जितेश सतीष गुप्ता रा. टिळकचौक, चाळीसगाव यांचे प्रदीपदादानगर, देशमुख-राजपूत स्मशानभूमीसमोर गुप्ता एजन्सी नावाचे दुकान आहे. ते चाळीसगावा किराणा माल वितरीत करतात. पत्नीच्या वैद्यकीय उपचारासाठी ते बाहेरगावी गेले होते. दुकानात कामाला असलेल्या मुलाला लक्ष ठेवण्या सांगितले. दि. 11 मार्च रोजी गुप्ता यांनी दुकानातील मालाची तपासणी केला असता किराणा माल कमी दिसून आला.

दुकानातील संतूर साबणाचे बॉक्स, सरगम साबण, वाघ बकरी चहा, ऑल आऊट, जिरे, बेसनपीठ, भांड्यांचा साबण असा सुमारे 47 हजार रूपये किंमतीचा किराणा माल गायब झाल्याचे दिसून आले. कोणीतरी चोरट्याने दुकानाच्या मागच्या बाजुच्या दरवाजाचा कडीकोेंडा व कुलूप तोडून प्रवेश करून किराणा विक्रीचा माल लंपास केल्याचे समोर आले. याप्रकरणी दुकानमालक गुप्ता यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याच्या विरोधात चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या