तरुणावर लोखंडी रॉड व बांबूने हल्ला; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
चाळीसगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – शहरातील घाटरोड परिसरात जुन्या वादातून तरुणावर लोखंडी रॉड व लाकडी बांबूने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, जहागीरदार वाडी येथील रेहान खान मंजूर खान (वय १९) या तरुणाने दिलेल्या फिर्यादीनुसार, १५ फेब्रुवारी रोजी दुपारी सुमारे १२.४० वाजता तो घाटरोड पोलीस चौकीच्या पाठीमागील गल्लीतून जात असताना जुन्या वादाच्या कारणावरून मुफीद रेहमान मुजावर याने लोखंडी रॉडने तर मोहसीन मुजावर याने लाकडी बांबूने त्याच्यावर पाठीवर, पायावर व डोक्यावर मारहाण केली. या हल्ल्यात रेहान खान याच्या उजव्या हाताच्या मनगटाजवळील हाड फ्रॅक्चर होऊन त्याला गंभीर दुखापत झाली.दरम्यान, फिर्यादीच्या वडिलांना देखील मुफीद मुजावर, मुजीब रेहमान मुजावर व सोहेल शफी शेख यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.घटनेनंतर रेहान खान बेशुद्ध पडल्याने मजहर खान मन्सूर खान व हसन खान मेहमुद खान यांनी त्याला खासगी वाहनातून धुळे जिल्हा रुग्णालयात दाखल केले. उपचारानंतर वैद्यकीय प्रमाणपत्र मिळाल्यानंतर पीडित तरुणाने चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.या प्रकरणी मुफीद रेहमान मुजावर, मोहसीन मुजावर, मुजीब रेहमान मुजावर व सोहेल शफी शेख (सर्व रा. बाराभाई मोहल्ला, चाळीसगाव) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

