Sunday, March 15, 2026
Homeकृषीशेतकऱ्यांना कर्जमाफी नको कर्जमुक्त करा जिल्हाध्यक्ष. किशोर पाटील यांचे प्रतिपादन सरकारच्या भूमिकेबद्दल...

शेतकऱ्यांना कर्जमाफी नको कर्जमुक्त करा जिल्हाध्यक्ष. किशोर पाटील यांचे प्रतिपादन सरकारच्या भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त करत केली मागणी

शेतकऱ्यांना कर्जमाफी नको कर्जमुक्त करा
जिल्हाध्यक्ष. किशोर पाटील यांचे प्रतिपादन
सरकारच्या भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त करत केली मागणी
जळगांव खान्देश लाईव्ह न्युज प्रतिनिधी शेतकऱ्यांच्या दृष्टीने ही कर्जमाफी पूरक नसून ही शेतकऱ्यांची थट्टा आहे असा सवाल शरद जोशी प्रणित शेतकरी संघटना जिल्हा अध्यक्ष किशोर पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे . आपली भूमिका स्पष्ट पणे मांडली.
सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी. त्यापेक्षा शेतकऱ्यांना कायमस्वरूपी कर्जमुक्ती करत शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. कर्जमाफी शब्दाचा अपभ्रंश करून *कर्जमुक्ती* अशी कायमस्वरूपी शब्दरचना करत. सततच्या कर्जाच्या दडपणापासून मुक्ती देण्यात यावी. असे त्यांनी नमूद केले
कर्जमाफी योजनेमध्ये लावण्यात आलेले विविध निकष .त्रुटी. यामुळे ही योजना विशेष करून कागदपत्रांसाठी शेतकऱ्यांना अजूनही हेलपाटे मारत नाकी नऊ येईल व अनेक शेतकरी लाभा पासून वंचित राहत असल्याचे खंत शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर पाटील यांनी व्यक्त केली आहे
महाराष्ट्र राज्यात आजपर्यंत वेगवेगळी सरकार आली व कर्जमाफी घोषणा करून तात्पुरता दिलासा तिथे. परंतु उत्पादन खर्चाचा विचार केला असता सध्या स्थितीत शेतकऱ्यांना शेती न परवडणारी असून शेतकऱ्यांना इतर देशांप्रमाणे एकरी अनुदान देत शेतकऱ्यांना तेवढेच पाठबळ होऊन आर्थिक स्थर वाढेल. शेतीचा वाढता खर्च महागडी बियाणे महागडे रासायनिक खते यंत्रसामग्री आणि उत्पादन खर्चापेक्षा कमी बाजार भाव अनियमित हवामान सततचा अवकाळी व शेतकऱ्यांच्या मानेवर बसलेली आसूड घेणारी पिक विमा योजना अशा विविध धोरणांमुळे शेतकरी जास्त कर्जबाजारी होत असून आधुनिक तंत्रज्ञान सरकारने उपलब्ध करत शेतकऱ्यांना दिलासा द्यावा
जाहीर केलेली कर्जमाफी ही शेतकऱ्यांच्या किती पदरी पडते येणारा काळ ठरवेल. त्यापेक्षा सरसुकट सातबारा कोरा करावा .
कर्जाच्या ओझ्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडत असून दर दिवसाला आत्महत्याचे प्रमाणहि. चिंताजनक असून. चिंताजनक बाब दिसत आहे.
शेतकऱ्यांना आर्थिक सक्षम करणारी व्यापक कर्जमुक्ती योजना राबवावी व शेतकऱ्यांच्या उत्पादनाला योग्य बाजार भाव योग्य बाजारपेठ मिळवून शेतकऱ्यांना कर्जापासून कायमस्वरूपी मुक्त करावे असे प्रतिपादन. शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष किशोर पाटील यांनी केले आहे .

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या