गोवंश कत्तली साठी जाणारे 7 गोवंश पकडले ; गुन्हा दाखल!

<img class

चाळीसगाव खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क – छोट्या वाहनात निर्दयतेने कोंबून गोवंश कत्तलीसाठी नेताना गोरक्ष यांनी दि 14 रोजी पकडून चाळीसगाव शहर पोलिसांच्या ताब्यात दिले आहेत या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन ला गुन्हा दाखल करण्यात आला असून 5 लाख रुपये किमतीचे 2 वाहनसाह 1 लाख 62 हजार रुपये किमतीचे 3 बैल व 4 गोऱ्हे ताब्यात ताब्यात घेवून वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दि 14/3/26 रोजी सकाळी 10-28 वाजेच्या सुमारास चाळीसगांव ते भडगांव रोड वर पातोंडा रोडवर दौलत हॉटेल जवळ पांढ-या रंगाची सुझुकी कंपनीची सुपर कॅरी मॉडल असलेली MH54 0311 गाडीमध्ये एक लाख रुपये किमतीचे 4 गोवंश जातीचे गो-हे दोरीच्या साहाय्याने निर्दयतेने बांधुन त्यांना वेदना होतील असे कत्तली साठी कोंबून विनापरवाना घेवुन जाताना मिळून आले.तर दि 10/3/26 रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास चाळीसगांव ते जामडी रोड वर वाघडु गावातील बसस्टँडवरील रोडवर 2 लाख 50 हजार रुपये किमतीची मालवाहतुक टाटा एस कंपनीची MH 195 6723 गाडीमध्ये 62 हजार रुपये किमतीचे 3 गोवंश जातीचे बैल दोरीच्या साहाय्याने निर्दयतेने बांधुन त्यांना वेदना होतील असे कत्तली साठी कोबुंन विनापरवाना घेवुन जातांना मिळुन आले.याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन ला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

