Monday, March 16, 2026
Homeजळगावपंडित प्रदीप मिश्रा यांचे भुसावळ भाविकांना आवाहन

पंडित प्रदीप मिश्रा यांचे भुसावळ भाविकांना आवाहन

प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये सत्कर्म करावे.

पंडित प्रदीप मिश्रा यांचे भुसावळ भाविकांना आवाहन

भुसावळ-   खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी     प्नुष्य जन्म हा 84 लक्ष योनी नंतर मिळतो म्हणून सर्वांनी देवाधिदेव शिवाची भक्ती करून या जन्मात सत्कर्म करावे म्हणजे आपल्या जीवनाचे सार्थक होईल असे प्रतिपादन प्रसिद्ध शिवमहापुराण कथाकार पंडित प्रदीप जी मिश्रा यांनी आज भुसावळत केले
भुसावळ येथील तापी किनारी आयोजित शिवमहापुराण कथेच्या चौथ्या दिवशी त्यांनी भाविकांना सांगितले की 84 योनी मधील बाकी इतर कोणत्याच योनीमध्ये प्राण्याला समजण्याची शक्ती नाही ती शक्ती केवळ मानवाला परमेश्वराने दिलेली आहे समजण्याची शक्ती फक्त मानवातच आहे त्यामुळे प्रत्येकाने आपले जीवन जगत असताना शिवभक्ती जरूर करा
आज समाजात होणारे घटस्फोटाबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली. आज तरुणांमध्ये पहिले लग्न काही दिवसानंतर घटस्फोट त्यानंतर पुन्हा दुसरे लग्न होत आहेत मग पती-पत्नीमध्ये कुठले प्रेम आहे? असा सवाल करून त्यांनी आज मुलांची लग्न होत असताना घटस्फोटाचे वाढते प्रमाण हे योग्य न सल्याचे मत व्यक्त केले
सनातन धर्मात अगोदर असे कधीही होत नव्हते तलाकची प्रथा ही सनातन धर्मात कधीच नव्हती तर ती दुसऱ्या धर्मात आहे सनातन धर्मात तर पती-पत्नीचा रिश्ता हा सात जन्माचा असून पती-पत्नीचा सुसंवाद हा शेवटच्या क्षणापर्यंत टिकून राहण्याची परंपरा आहे तरुण-तरुणी यांना निवेदन करून त्यांनी सांगितले की शंकरजी यांची व्रत करणारा मुलगा किंवा मुलगी मिळाली तर तुमचे भाग्य नक्कीच बदलेत त्यात मुले मुली शिवाजी आराधना करतील तर त्यांच्या कधीच घटस्फोट होणार नाही
पंडित मिश्रा यांनी सुरत येथील प्रसिद्ध कायदे तज्ञ यांना सध्या घडणारा घटस्फोटाबाबत विचारले की आपल्याकडे येणाऱ्या घटस्फोटाची किती केसेस या येत आहेत तेव्हा त्यांनी सांगितले की केस तर भरपूर येत आहेत मात्र जे मुले मुली शिवाची आराधना करतात त्यांचाही कधी घटस्फोट होत नाही
आजच्या पालक वर्गाने वडीलधाऱ्या व्यक्तींनी आई-वडिलांनी आपल्या मुलांना मुलींना शिवमंदिरास जाण्यास सांगून एक लोटा जल अर्पण करायला सांगा आजच्या धावपळीच्या युगात त्यांना वेळ नसेल तर थोडे समजावून सांगा त्यांनी मंदिरात जाणे सुरु केले तर त्यांची जिंदगी कधीही बरबाद होणार नाही त्यांना कधीही कुणापुढे हात पसरण्याची गरज पडणार नाही हे निश्चित आहे शिवाची आराधना कधीही त्यांना कमी पडू देणार नाही
तर पुरुष वर्गाला संबोधित करताना त्यांनी सांगितले की ज्या महिला आज सोमवार किंवा पशुपतिनाथ व्रत करत असतील व तुमचे रक्षण करत असतील तर ते नक्कीच चांगले कार्य आहे आज या पावन स्थळी सर्वजण पवित्र शिव महापुराण कथा ऐकण्यास येथे एकत्र झाला आहात आपल्या जीवनात काही परिवर्तन झाले पाहिजे आपल्याला दुःख वेदना कमी झाल्या पाहिजेत या भावनेने देवाधिदेव शिवाला स्मरण करून सर्वजण येथे मोठ्या संख्येने आला आहात मात्र कथा ऐकून तुमच्यात परिवर्तन झाले पाहिजे ते आचरणात दिसले पाहिजे सर्वांनी आपला अहंकार सोडून दिला पाहिजे प्रत्येकाचे मन हे साफ असले पाहिजे
जे कथा ऐकत असतांना शिवाजीभक्ती करत असतांना प्रत्येकाने सदैव अहंकाराचा त्याग केला पाहिजे तसेच भगवंताला मिळवण्यासाठी सत्संगाचा चांगला विचार तुमच्या चेहऱ्यावर दिसला पाहिजे जसे शिव मंदिरात जाऊन जल अर्पण केल्यानंतर चेहरा प्रसन्न होतो ते कोणाला सांगण्याची गरज पडत नाही तशीच शिवमहापुराण कथा ऐकून याची चमक मरेपर्यंत नक्कीच कमी होणार नाही
माणसाच्या शेवटच्या क्षणी हॉस्पिटलमध्ये जीवन रक्षक प्रणालीवर असताना तुमच्यासोबत मुला- सुने नातवंडे नातेवाईक भरपूर पैसे खर्च करतील चांगला डॉक्टर उपलब्ध करून देतील मात्र चांगले स्वास्थ्य कोणीही देऊ शकणार नाही त्यावेळेस मात्र तुमचे पुण्यचं कामी येणार म्हणून आयुष्यात भरपूर पुण्य कमवा असेही त्यांनी सांगितले
आजच्या कथेच्या चौथ्या दिवशी वातावरणात प्रचंड उष्णता असतानाही सकाळी दहा वाजेपासूनच भाविकांचे जथ्थे सभा मंडपात येत होते दुपारी एक वाजेपर्यंत बहुतेक सभा मंडप भरलेले होते. उद्या शनिवार व रविवारी शासकीय कार्यकर्त्यांना सुट्टी असल्याने अजून गर्दी वाढण्याची शक्यता आहे
या सातदिवशीय शिवमहापुराण कथेसाठी आयोजकांचे नियोजन हे चोख होते सभेसाठी आलेल्या लाखो भाविकांची गर्दी असतानाही सर्वकाही सुरळीत सुरू आहे सर्व भाविकही शिस्तीने आयोजकांच्या नियोजनाला साथ देत आहेत
या संपूर्ण कार्यक्रमाच्या नियोजनाची जबाबदारी शिरपूर येथील शंभू इन्व्हेंट यांचेकडे सोपविण्यात आलेली आहे
भव्य दिव्य सभा मंडपात भाविकांची येण्याची जाण्याची व्यवस्था भाविकांना पाणी व जेवणाची सतत सेवा आदी सेवा यशस्वी विद्या सुरू आहे
शंभू इनवेंटचे चेतन चौधरी हे सर्व दूर स्वतः लक्ष देऊन आहे

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या