भादली रेल्वे स्टेशन नजिक अज्ञात इसमाचा मृत्यु
भुसावळ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
भुसावळ रेल्वे विभागातील भादली रेल्वे स्टेशन जवळ ३५ वर्षीय इसमाचा रेल्वे च्या धक्क्याने जखमी होवुन मृत्यु झाल्याची घटना १२ मार्च रोजी घडली असून भुसावळ लोहमार्ग पोलिस ठाण्यात २ २ / २०२६ प्रमाणे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे .
मयताची उंची :- 5 फुट 7 इंच असून रंग
निमगोरा , डोक्याचे केस :- काळे साधारण वाढलेले , लांबट, दाढी मिषी काळी वाढलेली,
नाक :- सरळ तसेच अंगात फुलबाहीचे हिरव्या रंगाचे शर्ट पांढ-या रंगाचा बनियन निळ्या रंगाची पॅन्ट काळया रंगाची अंन्डर वियर असे वर्णन होते . या इसमा बाबत माहिती असल्यास रेल्वे पोलीसांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे .

