Monday, March 16, 2026
Homeआंदोलनवरणगावात ‘समाधान शिबीर’ पुढे ढकलले; संतप्त नागरिकांचा भुसावळ तहसीलवर मोर्चा

वरणगावात ‘समाधान शिबीर’ पुढे ढकलले; संतप्त नागरिकांचा भुसावळ तहसीलवर मोर्चा

वरणगावात ‘समाधान शिबीर’ पुढे ढकलले; संतप्त नागरिकांचा भुसावळ तहसीलवर मोर्चा

वरणगाव खान्देश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
मंडळ स्तरावरील छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबीर वरणगाव नगरपरिषद येथे दि१६ मार्च रोजी आयोजित होणार असल्याची माहिती प्रशासनाकडून दिली होती. शिबिर रद्द झाल्याने नागरिकात संतापाची लाट उसळली आहे . या अनुषंगाने तहसीलदारांच्या प्रतिनिधी नायब तहसीलदार प्रीती लुटे यांच्या उपस्थितीत शिबिराच्या पूर्वतयारीची बैठकही पार पडली होती.

मात्र, शिबीर प्रत्यक्ष दिवशी पुढे ढकलल्याची माहिती समोर येताच नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली. सकाळपासूनच वरणगाव नगरपरिषद येथे सुमारे ३०० च्यावर नागरिकांची गर्दी झाली होती. रेशन कार्डसंदर्भातील नोंदणी, १४ अंकी क्रमांक मिळविणे, नाव वाढवणे किंवा कमी करणे यांसारख्या कामांसाठी नागरिक मोठ्या अपेक्षेने शिबिरात सहभागी होण्यासाठी आले होते.
शहरातील अनेक गोरगरीब नागरिकांनी दिवसभराचा रोजगार बुडवून नगरपरिषदेत हजेरी लावली होती. तहसिल विभागाचे अधिकारी आलेच नाही .नगराध्यक्ष सुनील काळे यांनी नागरिकांची नोंद घेण्यासाठी टेबल लावून नोंदणी प्रक्रिया सुरू केली होती. मात्र शिबीर पुढे ढकलल्याची माहिती मिळताच नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त झाली.
संतप्त नागरिकांनी विचारले, “१६ तारखेला होणारे शिबीर कोणाच्या आदेशावरून रद्द किंवा पुढे ढकलण्यात आले.
यानंतर दुपारी सुमारे १२ वाजता नागरिकांनी वरणगावहून भुसावळ तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. जवळपास ३०० नागरिक तहसील कार्यालयात दाखल होऊन प्रशासनाकडे जाब विचारण्याच्या भूमिकेत असल्याचे दिसून आले.

प्रशासनाकडून दिलेल्या माहितीनुसार, घरगुती गॅस सिलेंडर तुटवड्यामुळे शिबीर पुढे ढकलण्यात आले आहे. भुसावळ पुरवठा विभाग गॅस सिलेंडर तुटवड्याबाबत तपासणी करत असल्याचे सांगण्यात आले. तहसीलदार निता लबडे यांनी नागरिकांना दिलगिरी व्यक्त करत सांगितले, “काल याबाबत पत्र काढण्यात आले होते. त्यामुळे नागरिकांना काही गैरसोयी झाल्या असतील तर प्रशासनाच्या वतीने दिलगिरी व्यक्त करतो.”

“शहरातील अनेक गोरगरीब आणि मजूर वर्ग नागरिक रेशन कार्ड, धान्य किंवा अन्य लाभांपासून वंचित आहेत. प्रशासन त्यांना मदत करण्यासाठी तत्पर आहे. पुढील हप्त्यात नगरपरिषदेच्या परिसरात शिबीर लवकरच आयोजित केला जाईल आणि नागरिकांनी त्या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.”
“नागरिकांनी आपला संताप व्यक्त करण्यासाठी तहसील कार्यालयाकडे मोर्चा काढला, हे आम्ही समजून घेतो. प्रशासन नागरिकांच्या भावना समजून घेते आणि त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी तत्पर आहे. पुढील शिबीर अधिक सुव्यवस्थित आणि सुलभ पद्धतीने पार पडेल.”
“नागरिकांनी संयम ठेवावा आणि प्रशासनावर विश्वास ठेवावा. लवकरच तारीख निश्चित करून शिबीर आयोजित केला जाईल आणि नागरिकांच्या समस्यांवर तत्परतेने उपाय केले जातील. असे
निता लबडे ‘
भुसावळ तहसिलदार यांनी सांगितले आहे .

या घटनेमुळे वरणगाव नगरपरिषद मध्ये काही काळ परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते, मात्र पोलिस प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचे प्रयत्न सुरू ठेवले आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या