जिल्हा कबड्डी निवड चाचणी स्पर्धेत भुसावळ चे महाबली प्रथम
भुसावळ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
जळगाव जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या वतीने आयोजित ७३ वी जिल्हा पुरुष व महिला अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धा २०२५–२६ स्व. बबन भाऊ बाहेती महाविद्यालय, जळगाव येथे दिनांक १४ ते १५ मार्च २०२६ या कालावधीत उत्साहात पार पडली. या स्पर्धेत मुलांच्या २६ संघांनी तर मुलींच्या ६ संघांनी सहभाग नोंदवला. जळगाव, भुसावळ, भडगाव, पाचोरा, एरंडोल, रावेर, मुक्ताईनगर आणि जामनेर या तालुक्यांतील संघांनी स्पर्धेत भाग घेतला होता.
अत्यंत चुरशीच्या झालेल्या सामन्यांमध्ये पुरुष गटात महाबली क्रीडा प्रसारक मंडळ, भुसावळ यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत प्रथम क्रमांक पटकावला.
अंतिम सामन्यात महाबली मंडळाने क्रीडारसिक स्पोर्ट्स क्लब, जळगाव यांच्यावर ४४ × ३६ अशा ९ गुणांच्या फरकाने विजय मिळवत विजेतेपद पटकावले. या सामन्यात महाबली संघाने सुरुवातीपासूनच आघाडी राखली.
महाबली संघाकडून प्रथमेश पाटील यांनी उत्कृष्ट चढाया करत संघाला महत्त्वाचे गुण मिळवून दिले. त्यांना मनीष निकम, जीवन नायदे, देवाक पाटील, गणेश लोहार, विक्की खंडारे, वेदांत ठोसर आणि चेतन लोहार यांनी क्षेत्ररक्षणात भक्कम साथ दिली. संघाचे प्रशिक्षक संकेत माने तर संघ व्यवस्थापक म्हणून टीकाराम पाटील यांनी जबाबदारी सांभाळली.
पुरुष गटात द्वितीय क्रमांक क्रीडारसिक स्पोर्ट्स क्लब, जळगाव तर तृतीय क्रमांक महर्षी वाल्मीक संघ, जळगाव यांनी मिळवला.
महिला गटात जय श्रीराम स्पोर्ट्स क्लब, पहूर पाळधी यांनी प्रथम क्रमांक मिळवला. क्रीडारसिक स्पोर्ट्स क्लब, जळगाव यांनी द्वितीय तर नेताजी सुभाष व्यायामशाळा, जळगाव यांनी तृतीय
क्रमांक पटकावला.
स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्यास जळगाव जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सहकार्यवाहक नितीन बर्डे, कार्याध्य

