शहरातील महादेव मंदिर परिसरातून दुचाकी चोरी; १५ दिवस उलटूनही तपास ठप्प

<img class

चाळीसगाव खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क – तालुक्यातील खरजई-तरवाडे शिवारातील टाकेश्वर महादेव मंदिर परिसरातून दुचाकी चोरीची घटना घडून तब्बल १५ दिवस उलटले तरीही चाळीसगाव ग्रामीण पोलिसांना कोणताही ठोस धागादोरा सापडलेला नसल्याने तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. विक्की पानकर यांनी
याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, दि. १ मार्च रोजी दुपारी सुमारे अडीच वाजता ते मित्रासह तरवाडे शिवारात बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी गेले होते. त्यांनी आपली हिरो कंपनीची एचएफ डिलक्स (क्र. MH-19 EM 6177) ही दुचाकी टाकेश्वर महादेव मंदिराच्या पाठीमागे हँडल लॉक करून उभी केली होती. मात्र सुमारे अर्ध्या तासानंतर परत आल्यावर संबंधित ठिकाणी दुचाकी आढळून आली नाही.परिसरात शोध घेतल्यानंतरही दुचाकीचा पत्ता लागला नाही. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र १५ दिवस उलटूनही तपासात कोणतीही ठोस प्रगती झालेली नसल्याने तक्रारदाराने नाराजी व्यक्त केली आहे.
जिल्ह्यातील इतर ठिकाणी चोरीच्या घटनांमध्ये अल्पावधीत आरोपींसह वाहन जप्त झाल्याची उदाहरणे असताना, या प्रकरणात अपेक्षित गती दिसून येत नसल्याचे पानकर यांनी सांगितले. त्यामुळे पोलिसांनी तपासाला वेग देऊन चोरीचा उलगडा करावा, अशी मागणी होत आहे.

