Thursday, March 19, 2026
Homeगुन्हासंतापजनक - अल्पवयीन मुलीचा विनयभंग करत मारहाण !

संतापजनक – अल्पवयीन मुलीचा विनयभंग करत मारहाण !

संतापजनक – अल्पवयीन मुलीचा विनयभंग करत मारहाण !

मुक्ताईनगर खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क – शहरातील एका महाविद्यालय परिसरात अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून तिला मारहाण केल्याची संतापजनक घटना घडली आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून, शाळा आणि महाविद्यालयीन परिसरात विद्यार्थ्यांच्या, विशेषतः मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी संशयित आरोपीला अवघ्या काही तासांत बेड्या ठोकल्या आहेत.

याबाबत सविस्तर वृत्तांत असे की,मुक्ताईनगर तालुक्यातील वास्तव्यास असलेली १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी महाविद्यालयाच्या आवारात असताना ही घटना घडली. संशयित आरोपी यशवंत इंगळे याने पीडितेचा रस्ता अडवला. तू माझ्यावर प्रेम का करत नाही? माझ्याशी का बोलत नाही? असे विचारत त्याने पीडितेचे केस ओढून तिला मारहाण केली. आरोपीने अत्यंत अश्लील भाषेत शिवीगाळ करत तिचा विनयभंग केला. भरदिवसा आणि महाविद्यालयीन परिसरात अशा प्रकारची घटना घडल्याने पालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. शिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या मुली जर सुरक्षित नसतील, तर प्रशासनाचा वचक कुठे आहे? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. महाविद्यालय परिसरात टवाळखोरांचा वावर वाढत असल्याचे या घटनेतून स्पष्ट झाले आहे. घटनेची माहिती मिळताच मुक्ताईनगर पोलिसांनी तत्परता दाखवली. पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीवरून संशयित यशवंत इंगळे याच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक निलेश गोसावी या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या