श्री व्यास धनवर्षा सहकारी बँकेच्या तज्ञ संचालक पदी गणेश बुरुजताले यांची निवड.
यावल खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी दि.१९ येथील श्री व्यास धनवर्षा सहकारी बँकेच्या तज्ञ संचालक पदाच्या रिक्त जागेवर जे.डी.सी.सी.बँकेचे सेवानिवृत्त अधिकारी गणेश जगन्नाथ बुरुजवाले [ M Com . G . D . C .A . ] यांची नुकत्याच झालेल्या बँकेच्या संचालक मंडळाच्या सभेत सर्वानुमते निवड करण्यात आली.गणेश बुरुजवाले यांनी जे.डी.सी.सी.बँकेत विविध पदावर ३७ वर्ष सेवा बजावली आहे.
याप्रसंगी गणेश बुरूजवाले यांनी संचालक मंडळाचे आभार मानले व आपण आपल्या अनुभवाचा फायदा बँकेला करून देऊ असे सांगितले.या वेळी बँकेचे अध्यक्ष हेमंत चौधरी,उपाध्यक्ष शरद यावलकर,संचालक जगदिश कवडीवाले,महेश वाणी,यशवंत सोनवणे,तेजस यावलकर,सुनिता गडे,सिईओ चंद्रकांत वाणी यांचे सह संचालक व कर्मचारी वृंद हजर होते .

