Monday, March 23, 2026
Homeजळगावसाखरी गावात खडका प्रकरणाची पुनरावृत्ती? संशयित मुलावर जीवघेणा हल्ला; पोलिसांशी धक्काबुक्की

साखरी गावात खडका प्रकरणाची पुनरावृत्ती? संशयित मुलावर जीवघेणा हल्ला; पोलिसांशी धक्काबुक्की

साखरी गावात खडका प्रकरणाची पुनरावृत्ती? संशयित मुलावर जीवघेणा हल्ला; पोलिसांशी धक्काबुक्की

 

फेकरी ता.भुसावळ तालुक्यातील साकरी गावात खडका परिसरातील गुन्ह्याची पुनरावृत्ती झाल्याचा संशय निर्माण करणारी गंभीर घटना घडली आहे. एका संशयित अल्पवयीन मुलास जिवंत ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काही व्यक्तींनी संबंधित हेमराज तायडे रा . कठोरा या युवकावर हल्ला करत त्याला गंभीर जखमी केले. घटनेची माहिती मिळताच पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. मात्र, पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत असताना काही स्थानिकांनी त्यांच्याशी हुज्जत घालत धक्काबुक्की केली. तसेच अरेरावीची भाषा वापरत सरकारी कामात अडथळा निर्माण केला.
या प्रकारामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून पोलिसांनी संबंधितांविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणणे, पोलिसांशी गैरवर्तन करणे यांसारख्या गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
जखमी मुलास तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे. या घटनेमागील नेमके कारण आणि संबंधित आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
दरम्यान, साकरी गावात तणावपूर्ण शांतता असून पुढील अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. स्थानिक नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन पो. नि महेश गायकवाड यानी करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या