Wednesday, March 25, 2026
Homeगुन्हाभुसावळात घोडेपीर दर्गा परिसरात चाकूहल्ला; परस्परविरोधी गुन्हे दाखल

भुसावळात घोडेपीर दर्गा परिसरात चाकूहल्ला; परस्परविरोधी गुन्हे दाखल

भुसावळात घोडेपीर दर्गा परिसरात चाकूहल्ला; परस्परविरोधी गुन्हे दाखल
भुसावळ    खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी          – शहरातील शिवपूर कन्हाळा रोडवरील घोडेपीर बाबा दर्गा परिसरात २४ मार्चच्या रात्री चाकूहल्ल्याची गंभीर घटना घडली असून या प्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पहिल्या तक्रारीनुसार, जाम मोहल्ला येथील १८ वर्षीय मो. अल्फेश मो. अशरफ शेख हा रात्री सुमारे १० वाजता दर्गा परिसरात गेला असता तेथे डीजे सुरू असताना गर्दीत दोन गटांत वाद झाला. या गोंधळात जावेद गट्ट गवळी हा एका व्यक्तीवर चाकूने हल्ला करत असताना तोच चाकू अल्फेशच्या डाव्या मांडीत घुसल्याने तो जखमी झाला. त्याला तातडीने ट्रॉमा केअर सेंटर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. याप्रकरणी जावेद गट्ट गवळी याच्याविरोधात तक्रार नोंदविण्यात आली आहे.

 


दुसऱ्या फिर्यादीत, शिवपूर कन्हाळा येथील १८ वर्षीय वसीम सलीम गवळी याने दिलेल्या जबाबानुसार, तो आपल्या मित्रांसह संदल निमित्त दर्ग्यात गेला होता. रात्री परतताना आक्रोश गवळी याची कॉलर पकडून काही जणांनी वाद सुरू केला. वाद सोडवण्यासाठी गेलेल्या वसीम व त्याच्या मित्रांवर बंटी उर्फ अल्फेश, मुजाहीद शेख, शाहीन शेख आणि फैजान शेख यांनी चाकू, दांडके व लाथाबुक्क्यांनी हल्ला केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात वसीम, रेहान गवळी व आफान गवळी जखमी झाले असून त्यांच्यावर मानवतकर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. आफान गवळी याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे.
या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलीसांनी दोन्ही बाजूंच्या तक्रारींवरून गुन्हे दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या