Wednesday, March 25, 2026
Homeजळगाववझरखेड्यात गौण खनिज घोटाळ्याचा स्फोट; सरपंचांची उच्चस्तरीय चौकशीची मागणी

वझरखेड्यात गौण खनिज घोटाळ्याचा स्फोट; सरपंचांची उच्चस्तरीय चौकशीची मागणी

वझरखेड्यात गौण खनिज घोटाळ्याचा स्फोट; सरपंचांची उच्चस्तरीय चौकशीची मागणी

भुसावळ    खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी              दि 23
भुसावळ तालुक्यातील वझरखेडे गावात गौण खनिजाच्या अवैध उत्खनन व वाहतुकीचा मोठा घोटाळा उघडकीस आल्याचा आरोप होत असून, यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. गावचे लोकनियुक्त सरपंच दिलीप दौलत सुरवाडे यांनी थेट नाशिक विभागीय आयुक्तांकडे धाव घेत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.

सरपंचांच्या म्हणण्यानुसार, गट क्रमांक ६१ व ६२ मध्ये मोठ्या प्रमाणावर खनिज उत्खनन करून त्याची खुलेआम विक्री करण्यात आली. याबाबत वारंवार तक्रारी करूनही संबंधित मंडळ अधिकारी जयश्री तायडे यांनी दुर्लक्ष केल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
जिल्हाधिकारी व तहसील प्रशासनाकडे तक्रार केल्यानंतर काही कारवाई झाली असली, तरी संपूर्ण उत्खननाचे मोजमाप करून दंड वसूल करण्यात आलेला नाही. त्यामुळे शासनाला मोठ्या महसुलाचा फटका बसल्याची शक्यता व्यक्त होत आहे.याशिवाय, गट क्रमांक २०८ मध्येही अवैध उत्खनन झाल्याचा दावा करण्यात आला असून, वझरखेडे धरणाच्या भिंतीला देखील नुकसान पोहोचवून खनिज काढण्यात आल्याचा धक्कादायक आरोप करण्यात आला आहे.

दरम्यान, ग्रामदक्षता समितीचे अध्यक्ष असूनही पंचनाम्यांपासून दूर ठेवण्यात येत असल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. गेल्या तीन वर्षांत एकदाही पंचनाम्यासाठी न बोलावल्याचा आरोप सरपंचांनी केला आहे.या सर्व प्रकरणात संबंधित अधिकाऱ्यांच्या कामकाजाची तसेच त्यांच्या संपत्तीची चौकशी करून कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सरपंच सुरवाडे यांनी केली असून, आता प्रशासन काय पावले उचलते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या