Saturday, March 28, 2026
Homeचाळीसगावअण्णाभाऊ साठे जलतरण तलाव नव्या रूपात; उन्हाळ्यात नागरिकांना मोठा दिलासा, जलतरणासाठी वाढती...

अण्णाभाऊ साठे जलतरण तलाव नव्या रूपात; उन्हाळ्यात नागरिकांना मोठा दिलासा, जलतरणासाठी वाढती गर्दी

अण्णाभाऊ साठे जलतरण तलाव नव्या रूपात; उन्हाळ्यात नागरिकांना मोठा दिलासा, जलतरणासाठी वाढती गर्दी

चाळीसगाव : खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी            शहरातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जलतरण तलाव अत्याधुनिक सुविधा व सुधारित व्यवस्थेसह नव्या रूपात सुरू झाल्यानंतर नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर तलावावर मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. त्यामुळे नागरिकांना उकाड्यात मोठा दिलासा मिळत आहे.
काही वर्षांपूर्वी अत्यंत दयनीय अवस्थेत असलेला हा तलाव आता आधुनिक फिल्टर प्लांट व विविध सोयीसुविधांनी सज्ज झाला आहे. स्वच्छता, सुरक्षितता आणि व्यवस्थापनात झालेल्या बदलामुळे जलतरणप्रेमींसह लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वच घटकांचा प्रतिसाद वाढला आहे.दररोज सकाळी व सायंकाळी तलावावर नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळत असून, विशेषतः सुट्टीच्या दिवशी जलतरणासाठी येणाऱ्यांची संख्या अधिक वाढत आहे. उन्हाळ्याच्या कडक तापमानात हा तलाव नागरिकांसाठी थंडावा देणारा महत्त्वाचा पर्याय ठरत आहे.

याबाबत आमदार मंगेश चव्हाण यांनी सांगितले की, “चाळीसगावकरांच्या चेहऱ्यावरचे समाधान पाहून आनंद वाटतो. हा बदल केवळ जलतरण तलावापुरता मर्यादित नसून शहराच्या विकासाचा भाग आहे. नागरिकांच्या सहकार्याने चाळीसगावला प्रगतीच्या दिशेने नेण्याचा आमचा प्रयत्न कायम राहील.”
दरम्यान, या उपक्रमामुळे शहराच्या पायाभूत सुविधांमध्ये सकारात्मक बदल झाल्याचे नागरिकांकडून सांगितले जात असून भविष्यातही अशा सुविधा वाढवाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या