घरगुती गॅस सिलेंडरची कृत्रिम टंचाई दाखवून सिलिंडर काळ्या बाजारात विक्री करणाऱ्या गॅस एजन्सी वर कारवाई करण्याची तहसीलदार यांना रयत सेनेची मागणी

चाळीसगाव खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी – सद्यस्थितीत युद्ध परिस्थिती असल्याने चाळीसगाव तालुक्यात घरगुती गॅस सिलिंडर साठी गॅस एजन्सी समोर ग्राहकांच्या रांगा लागत आहेत तरी देखील ग्राहकांना वेळेवर गॅस मिळत नसल्याने ग्राहकांना वेळेवर गॅस सिलिंडर देण्यासह घरगुती गॅस सिलेंडरची कृत्रिम टंचाई दाखवून सिलिंडर काळ्या बाजारात विक्री करणाऱ्या गॅस एजन्सी वर कारवाई करण्याची मागणी तहसीलदार प्रशांत पाटील यांना रयत सेनेच्या वतीने करण्यात आली आहे,
शहरातील काही एजन्सी चालक गॅस सिलिंडर ची कृत्रिम टंचाई निर्माण करीत असल्याचे दिसून येत आहे तसेच मोबाईल वर बुकिंग करून देखील गॅस सिलिंडर दिले जात नाही. ग्राहकांना जवळपास ९०० रुपये किमतीचा गॅस ग्राहकांना जादा दराने गॅस हंडी विक्री केल्या जात आहेत, तसेच घरगुती गॅस हॉटेल चालक, खासगी गॅस वाहने व इतर ठिकाणी काळ्या बाजारात जादा दराने विक्री करीत आहेत.
गॅस सिलिंडर ची कृत्रिम टंचाई दाखवून ग्राहकांना रोज गॅसचा नंबर लावून ही ग्राहकांना एजन्सी च्या पायऱ्या झिजव्याव्या लागत असल्याने ग्राहकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे . चाळीसगाव तालुका व शहरातील सर्व गॅस एजन्सी ला दररोज किती गॅस सिलिंडर साठा आला (मिळाला), एकूण वाटप व सायंकाळी एका वेळ निश्चित करून त्यावेळेस किती साठा शिल्लक आहे असा स्पष्ट शब्दात व सर्वांना समजेल अशा शब्दात फलक एजन्सी बाहेर लावावा, तसेच १ फेब्रुवारी २०२६ पासून चाळीसगाव तालुका व शहरातील सर्वच गॅस एजन्सीना आलेला गॅस सिलिंडर कोटा, झालेली वाटप, शिल्लक कोटा याची सर्व माहिती जनहितार्थ सार्वजनिक करावी.
या सर्व प्रकरणाची चौकशी करावी जादा दराने गॅस सिलिंडर विक्री करताना आढळल्यास अथवा यापूर्वी जादा दराने गॅस सिलिंडर विक्री केली असेल तर त्या गॅस एजन्सी चा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यासह गॅस ग्राहकांना वेळेवर गॅस सिलिंडर देण्याची मागणी तहसीलदार प्रशांत पाटील यांना दि २६ रोजी रयत सेनेच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे,निवेदनावर उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष आबासाहेब गरुड,जिल्हा उपाध्यक्ष गायकवाड,कामगार सेनेचे तालुका अध्यक्ष संजय हिरेकर,संघटक रोहन पाटील, युवा शहर अध्यक्ष सागर जाधव, तालुका उपाध्यक्ष मुकुंद पवार, भरत नवले,असलम बाबू मुल्ला, विवेक देठे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत

