Monday, July 6, 2026
Homeगुन्हाजुनोने शिवारात गावठी दारू निर्मितीवर छापा; एक जण ताब्यात

जुनोने शिवारात गावठी दारू निर्मितीवर छापा; एक जण ताब्यात

जुनोने शिवारात गावठी दारू निर्मितीवर छापा; एक जण ताब्यात
चाळीसगाव : खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी                 तालुक्यातील जुनोने शिवारात गावठी हातभट्टी दारू निर्मितीवर चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी छापा टाकत एकास ताब्यात घेतले. ही कारवाई करण्यात आली.मिळालेल्या माहितीनुसार, जुनोने येथील कुंडाच्या नाल्यात रूखमाबाई रतन मोरे यांच्या शेताजवळ एका इसमाकडून बेकायदेशीररित्या गावठी दारू तयार करण्यासाठी कच्चे रसायन भिजत घातल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक राहुल राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने पंचांसह घटनास्थळी छापा टाकला.या कारवाईत दगडू सदाशिव गायकवाड (वय 50, रा. जुनोने, ता. चाळीसगाव) यास जागीच पकडण्यात आले. त्याच्या ताब्यातून सुमारे 350 लिटर कच्चे रसायन (गुळ, नवसागर, एरंडी मिश्रित) जप्त करण्यात आले असून त्याची किंमत अंदाजे 12,250 रुपये आहे.पोलिसांनी नमुना म्हणून रसायन सीलबंद करून घेतले असून उर्वरित रसायन व साहित्य जागीच नष्ट करण्यात आले. याप्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65(फ) अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पुढील तपास चाळीसगाव ग्रामीण वरिष्ठठांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार प्रविण संगिले व अकराम बेग तपास करत आहेत.

Oplus_131072

<img class

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या